नवी दिल्ली : युट्युब या जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रीमिंग वेबसाईटचे पुढील सीईओ म्हणून भारतीय वंशांचे नील मोहन यांची नियुक्ती झाली आहे. युट्युबची मूळ कंपनी अल्फाबेट इंक यांनी गुरूवारी ही घोषणा केली आहे. युट्युबची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओ देखील भारतीय वंशाचेच आहेत. अल्फाबेटचे नेतृत्व सध्या सुंदर पिचई करीत आहेत. गुगल सुद्धा या कंपनीचा एक भाग आहे. त्यामुळे गुगलचे प्रमुख देखील पिचई आहेत. सुंदर पिचई यांची 2015 मध्ये गुगलचे सीईओ म्हणून निवड झाली.
कोण आहेत नील मोहन
नील मोहन यांनी स्टॅनफोर्डमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी यापूर्वी गुगलमध्ये मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून काम केले आहे. याआधी त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्येही काम केले आहे आणि बायो-टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणाऱ्या 23 एंडमी या कंपनीच्या बोर्डावरही काम केले आहे.
मायक्रोसॉफ्ट देखील भारतीयाच्या ताब्यात…
जगातील प्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नडेला आहेत. यापूर्वी ते क्ला्ऊड आणि एंटरप्राईज ग्रुपचे एक्झुकेटीव्ह व्हाईस प्रेसिडन्ड होते. आयबीएमवर देखील भारतीयांची मदार आहे. आयबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा आहेत. त्यांचे शिक्षण आयआयटी कानपूर मधून झाले आहे. ते फेडरल बॅंक ऑफ न्यूयॉर्कचे बोर्ड डायरेक्टर म्हणून देखील काम केले आहे.
आयटी कंपनी एडॉबचे सीईओ शंतनू नारायण आहेत. ते 1998 मध्ये एडॉबचे सीईओ झाले. त्यापूर्वी नारायण यांनी 1986 मध्ये सिलीकॉन व्हॅली स्टार्टअप मेजरक्स ऑटोमेशन सिस्टीममध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी 1989 ते 1995 पर्यंत एप्पल काम केले. विमिओच्या सीईओ अंजली सूद आहेत, तर शैनलच्या सीईओ लीना नायर आहेत.
या कंपन्यांचे सीईओ देखील भारतीय वंशाचे आहेत
स्टारबक्सचे सीईओ भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिम्हन आहेत. फेडेक्सचे सीईओ राज सुब्रमण्यम आहेत. vmware कंपनीचे सीईओ भारतीय वंशाचे रघू रघुराम आहेत. पलाओ अल्टोचे सीईओ निकेश अरोरा आहेत. Netapp चे सीईओ मूळचे भारतीय वंशाचे जॉर्ज कुरियन आहेत. गुगल क्लाऊडचे प्रमुखही भारतीय वंशाचे थॉमस कुरियन आहेत. तर ogilvy या कंपनीचे सीईओ देविका बुलचंदानी आहेत.