नवी दिल्ली | 20 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध फूड डीलिव्हरी कंपनी स्विगीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहर्ष मजेटी देशातील तरूण उद्योजक आहेत. त्यांच्या जन्म 1988 रोजी कर्नाटकातील बंगळुरु या शहरात एका उद्योजक परिवारात झाला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राजस्थानच्या बिरला इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एंड सायन्समधून इंजीनिअरिंग डीग्री घेतली. त्यानंतर 2011 मध्ये आयआयएम कोलकातातून एमबीए पूर्ण केले.
श्रीहर्ष मजेटी यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर लंडनमधील नोमुरा इंटरनॅशनलमध्ये इंटर्न म्हणून नोकरी केली. या ट्रेडींग कंपनीत त्यांचे फारसे मन रमले नाही. त्यांना स्वत:चा काही तरी स्टार्टअप सुरु करण्याची इच्छा त्यांनी शांत बसू देत नव्हती. अखेर एका वर्षातच त्यांनी नोकरी सोडून त्यांनी देशात परतणे पसंत केले. त्यांनी सायकलद्वारे फ्रान्स, इटली आणि स्पेनसह अनेक युरोपीय देशात 3,000 किमीचा प्रवास केला आहे.
मजेटी यांनी त्यांचा मित्र नंदन रेड्डी यांच्यासह 2013 मध्ये ईबे आणि फ्लिपकार्टला पर्याय देण्यासाठी बंडल ई – कॉमर्स कंपन्यांच्या डीलिव्हरीसाठी शिपींग कंपनी काढली. त्यानंतर पुढच्या वर्षी बंडलचे नाव बदलून त्यांनी स्विगी केले. पहाता पहाता स्विगी देशातील सर्वात मोठी ऑनलाईन फूड ऑर्डरिंग सर्व्हीस बनली. स्विगीचे 25 हून अधिक शहरात 20 हजाराहून अधिक रेस्टॉरंटशी पार्टनरशिप आहे. साल 2017 मध्ये एकाच महिन्यात पन्नास लाख ऑनलाईन ऑर्डरचा विक्रम स्वीगीने केला होता. मजेटी यांची संपत्ती 14,000 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. त्यांना मिळत असलेल्या पगाराबद्दल काही माहीती मिळालेली नाही.