नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जागतिक गुंतवणूक गोलमेज परिषद घेणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत अमेरिका, यूरोप, कॅनडा, कोरिया अशा २० देशांमधील बड्या कंपन्यांचे उद्योजक सहभागी होणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण, वरिष्ठ अधिकारी आणि वित्तीय क्षेत्रातील नियामकही या बैठकीला उपस्थित राहतील. भारतातील अनेक मोठे उद्योजकही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यात रतन टाटा, मुकेश अंबानी, नंदन नीलेकणी, उदय कोटक, दीपक पारेख आदी उद्योजकांचा समावेश असणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने भारताचं ५ हजार अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं लक्ष्य, आर्थिक सुधारणा आणि भारतीय अर्थव्यवस्था या मुद्द्यांचा समावेश असणार आहे. (Prime Minister Modi will host the Virtual Global Investor Roundtable Summit today)
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जागतिक गुंतवणूक गोलमेज परिषद 2020 चं आयोजन अर्थ मंत्रालय आणि राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी (NIIF)कडून करण्यात आलं आहे. शासकीय मालमत्ता निधी आणि निवृत्तीवेतन निधीसह जगभरातील सर्व प्रमुख गुंतवणूकदार या बैठकीत सहभागी असणार आहेत. या गुंतवणूकदारांकडे 6 हजार अब्ज डॉलरहून अधिक संपत्ती आहे.
या बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी, टाटा समुहाचे रतन टाटा, HDFCचे दीपक पारेख, सन फार्माचे दिलीप संघवी, इन्फोसिसचे नंदन निलेकणी आणि कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक यांसारखे अनेक दिग्गज उद्योजक सहभागी होणार आहेत.
त्याचबरोबर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणुकीसाठी आमंत्रित करणे, भारताची आर्थिक स्थिती आणि गुतंवणुकींच्या संधींबाबत माहिती देणे, हे या बैठकीची प्रमुख उद्दिष्ट्ये सांगितली जात आहेत.
पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत 36 लाखांनी वाढ; अमित शहांना शेअर बाजाराचा फटका
Prime Minister Modi will host the Virtual Global Investor Roundtable Summit today