नवी दिल्ली : ऑनलाईन अथवा डिजिटल पेमेंट करणाऱ्या आणि डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांसाठी महत्त्वाचे बदल होत आहेत (New rules of RBI about Debit and Credit card transaction). भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार 1 ऑक्टोबरपासून डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या व्यवहारांविषयी नवे 4 बदल होत आहेत. या बदलांचा थेट परिणाम हे व्यवहार करणाऱ्यांवर पडणार आहे. त्यामुळेच हे नवे नियम आणि बदल समजून घेणं आवश्यक आहे.
RBI च्या नव्या गाईडलाईन्स
कार्ड लिमिटमध्ये बदल
आता तुम्ही आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डची व्यवहार मर्यादा स्वतः निश्चित करु शकणार आहात. हे बदल तुम्ही आपल्या मोबाईल बँकिंग, बँकेचं अॅप किंवा एटीएमच्या माध्यमातून करु शकतात. कस्टमर केअरला फोन करुनही हे बदल करता येणार आहेत. नव्याने मिळणाऱ्या सेवांनुसार तुम्ही तुमच्या एटीएमच्या व्यवहारांची मर्यादा देखील स्वतःच निश्चित करु शकणार आहात.
कार्डचं प्राधान्य
नवे नियम लागू झाल्यानंतर कार्डधारक आपल्या व्यवहारांचा प्राधान्यक्रम देखील स्वतः सेट करु शकणार आहे. म्हणजेच तुम्ही एखाद्या सेवेचा अधिक वापर करत असाल तर तुम्ही त्याचा प्राधान्यक्रम पहिला घेऊ शकता. उदा. आंतरराष्ट्रीय व्यवहार, अंतर्गत व्यवहार, ऑनलाईन व्यवहार, कॉन्टॅक्टलेस व्यवहार यापैकी ज्या व्यवहारांचा अधिक वापर आहे त्याला तुम्ही पहिलं प्राधान्य देऊ शकणार आहात.
पेमेंट करण्याच्या पद्धतीत बदल
आता ग्राहकांना आरबीआयकडून केवळ अंतर्गत व्यवहारांना देखील परवानगी मिळू शकते. यानुसार एटीएम मशीनमधून पैसे काढताना किंवा POS टर्मिनलवर डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा उपयोग करुन शॉपिंग करताना परदेशी व्यवहारांना परवानगी असणार नाही. जर तुम्ही तुमच्या कार्डवर परदेशी व्यवहार केले नाहीत, तर तुमच्या कार्डावर केवळ घरगुती व्यवहारांनाच मंजूरी असेल.
परदेशी व्यवहारांच्या नियमांत बदल
यापुढे तुम्ही कोणत्याही कार्डवर परदेशी व्यवहारांची सुविधा वापरु शकता. यासोबतच तुम्हाला कोणत्या प्रकारच्या व्यवहारांची सेवा ठेवायची अथवा हटवायची याचा अधिकार कार्डधारकाकडेच असणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या नियमांच्या अंमलबजावणीला उशीर
आरबीआयने जानेवारीतच सर्व नियम बदलले होते, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या नव्या नियमांच्या अंमलबजावणीला उशीर झाला. आता या सर्व नियमांची अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे आजच आपल्या कार्डवर कोणत्या सुविधा सुरु करायच्या आणि कोणत्या नाही याचा निर्णय घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
तुमच्या खिशावर परिणाम करणारे हे 5 नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार
वॉलमार्ट ‘टाटा ग्रुप’मध्ये 1.8 लाख कोटींची गुंतवणूक करण्याची चिन्हं, अमेझॉन, रिलायन्सला टक्कर
Vodafone ची धोबीपछाड, भारत सरकारविरोधात 20 हजार कोटींचा खटला जिंकला
New rules of RBI about Debit and Credit card transaction