नववर्षानिमित्त सर्वाधिक मद्य विक्री करणारे ठरले हे टॉप राज्य, दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर

| Updated on: Jan 04, 2025 | 4:17 PM

देशभरात लोकांनी नववर्ष मोठ्या थाटामाटात साजरे केले. यावेळी लोकांनी विविध पद्धतीने नववर्ष साजरे केले आहे. अश्यातच अनेकजणांनी नववर्षांचे स्वागत त्याच्या आवडत्या ठिकाणी जाऊन साजरा केला तर अनेक लोकांनी नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने केली.

नववर्षानिमित्त सर्वाधिक मद्य विक्री करणारे ठरले हे टॉप राज्य, दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर
Follow us on

देशभरात नववर्ष २०२५चे स्वागत लोकांनी मोठ्या उत्साहात केले. अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने नववर्ष साजरे करण्यात आले. यावेळी अनेकांनी नववर्षांची सुरुवात ही देवदर्शन करू सुरु केली. तर काहीजणांनी बाहेर जाऊन आवडत्या ठिकाणी नववर्षाचे स्वागत केले तर काहींनी घरीच नातेवाईकांना मित्रांना बोलवून मस्त पार्टीचे आयोजन करून नववर्ष सेलिब्रेट केला. एवढेच नव्हे तर अनेकांनी नववर्षाचे औचित्य साधून गरजू लोकांना दान करून साजरा केला. पण यात देशभरात नववर्षानिमित्त सर्वाधिक प्रमाणात मद्यपानाची विक्री झाली असून यात असे काही राज्य आहेत टॉप ठरले आहे. नववर्षानिमित्त काही लोकांनी हॉटेल्स आणि रेस्टोरंटमध्ये डीजे पार्टी करत भरपूर मद्यपान केले. जाणून घेऊया नववर्षाच्या निमित्ताने देशातील विविध राज्यातील लोकांनी किती कोटींचे मद्यपान करण्यात आले.

संपूर्ण देशभरात नववर्षाचे औचित्य साधून दारू विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. नववर्षानिमित्त उत्तर प्रदेशात सर्वाधिक ६०० कोटी रुपयांच्या दारूची विक्री झाली. तर दिल्ली-एनसीआरमध्ये 400 कोटींची दारू विकली गेली आहे. नववर्षाच्या निमित्ताने दिल्लीच नव्हे तर देश-विदेशातील लोकांनीही हजारो कोटींचे मद्यपान प्रेमींनी मद्यपान केले आहे. देशात मद्यपान करण्याच्या बाबतीत लोकांनी नवा टप्पा गाठला आहे. याशिवाय कर्नाटकात 308 कोटींची दारू विकली गेली आहे, तर तेलंगणातील जनता कोणत्याही बाबतीत मागे राहिली नाही, येथील लोकांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला 402 कोटी रुपयांची दारूची विक्री झाली आहे.

केरळमध्ये १०८ कोटींची दारू विकली

हे सुद्धा वाचा

देशभरात नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी मद्यपान प्रेमींसाठी केरळमध्ये १०८ कोटी रुपयांची दारू विकली गेली आहे. ऑनलाइन ॲप्सवर तर दारू सोबत आलू भुजिया, चिप्स आणि बर्फाचे तुकडे सर्वाधिक विकले गेले आहेत. उत्तराखंडमध्येही नववर्ष मोठ्या थाटामाटात साजरे करण्यात आले. यावर्षी मद्यपान करणाऱ्या लोकांसाठी सुमारे १५ कोटी रुपयांची दारूची विक्री झाली. अशातच डेहराडून आणि नैनीतालसारख्या पर्यटनस्थळांवर सर्वाधिक दारू विकली जाते. उत्तराखंडमध्ये एका दिवसासाठी दारू विक्रीचे एकूण ६०० परवाने देण्यात आले, त्यात ३७ हजारांहून अधिक इंग्रजी दारूची विक्री झाली.

नोएडात १६ कोटींची दारूची विक्री

नववर्ष साजरा करताना उत्तर प्रदेशनेही दारू विक्रीच्या बाबतीत कोणतीही कसर सोडली नाही. नववर्षाच्या पूर्वसंध्येला येथे ६०० कोटी रुपयांची दारू विकली गेली आहे. एकट्या नोएडा शहरामध्ये दोन दिवसांत १६ कोटी रुपयांची दारू विकली गेली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात विक्री झाली आहे.