नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या महागाई नियंत्रण (RBI on Inflation) करणाच्या उपाय योजनांना आता यश येताना दिसत आहे. महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या घसरणीमुळे किरकोळ महागाई दर 5.88 टक्क्यांवर (Retail Inflation November 2022) पोहचला आहे. हा गेल्या 11 महिन्यातील सर्वात नीच्चांकी स्तर आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात महागाई अजून कमी होण्याचा अंदाज आहे. तसेच व्याजाचा बोजाही कमी होऊ शकतो.
गेल्या वर्षी डिसेंबर 2021 मध्ये महागाई दर 5.59 टक्के होता. तर ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई दर 6 टक्क्यांच्या वर होता. त्यावेळी महागाईचा दर 6.77 टक्के होता. तर सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर 7.41 टक्के होता. आता CPI मध्ये घसरण झाल्यावर सर्वसामान्यांच्या खिशावरील बोजा कमी होऊ शकतो.
किरकोळ महागाई दरात घसरणीमागे खाद्यपदार्थांचे आणि भाजीपालाचे दर कमी (Vegetables Became Cheaper) होणे हे सर्वात मोठे कारण आहे. ऑक्टोबर महिन्यात खाद्य पदार्थ महाग असताना महागाई दर 7.01 टक्के होता. तर नोव्हेंबर महिन्यात त्यात घसरण झाली. भाजीपाल्याच्या दरातही मोठी घसरण झाली.
बाजारातून आपण किती वस्तू खरेदी करतो, तुमची वस्तू खरेदी क्षमता किती आहे, यावर महागाई दर निश्चित होतो. त्यामुळे सर्वसामान्य माणूस खरेदी करताना हात आखडता घेतो. जर स्वस्ताई असेल तर तो हात सैल सोडतो. वस्तू जास्त खरेदी करतो. तसेच गुंतवणुकीवरही त्याचा परिणाम दिसून येतो.
RBI महागाई दरामुळे अनेक दिवसांपासून चिंतेत होती. महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयने यावर्षी पाचव्यांदा रेपो दरात वाढ केली होती. सातत्याने वाढ केल्याने रेपो दरात 6.25 टक्क्यांवर पोहचला. त्याचा परिणाम महागाईच्या आघाडीवर दिसून येत आहे.