Nirma Story : आपल्या दिवंगत मुलीच्या नावाने सुरू केली होती निरमा कंपनी, ही इनसाइड स्टोरी आहे खुपच भावूक

| Updated on: Aug 08, 2023 | 1:35 PM

देशातला नंबर वन वॉशींग पाउडर पाउडर असलेल्या निरमा कंपणीची (Nirma Story) गोष्टही तितकीच खास आहे. वॉशिंग पावडर निरमा हा भारतातील प्रसिद्ध ब्रँड आहे. मळके कपडे उजळण्यासाठी वापरली जाणारी ही वॉशिंग पावडर त्याच्या आत एक भावनिक गोष्ट लपलेली आहे.

Nirma Story : आपल्या दिवंगत मुलीच्या नावाने सुरू केली होती निरमा कंपनी, ही इनसाइड स्टोरी आहे खुपच भावूक
निरमा
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : दुध सी सफेदी निरमा से आये रंगीन कपडा भी खिल खिल जाये.. अंशी ते नव्वदीच्या दशकात ही धून प्रत्येक जण गुनगूनायचा. आजही वॉशींग पावडरला पर्यायी शब्द म्हणून निरमा आपण अगदी सहज वापरतो. देशातला नंबर वन वॉशींग पाउडर पाउडर असलेल्या निरमा कंपणीची (Nirma Story) गोष्टही तितकीच खास आहे. वॉशिंग पावडर निरमा हा भारतातील प्रसिद्ध ब्रँड आहे. मळके कपडे उजळण्यासाठी वापरली जाणारी ही वॉशिंग पावडर त्याच्या आत एक भावनिक गोष्ट लपलेली आहे. गोष्ट गुजरातमध्ये सुरू होते. गुजरातमधील अहमदाबाद येथे राहणाऱ्या करसनभाई पटेल यांनी आपली मुलगी परत मिळवण्यासाठी ही कंपनी सुरू केली. 1969 साली त्यांनी आपल्या घराच्या अंगणातून याची सुरुवात केली आणि आज ती करोडोंची उलाढाल असलेली मल्टीब्रँड कंपनी बनली आहे.

बाप-मुलीची भावनिक कहाणी

करसनभाई पटेल यांचा जन्म 13 एप्रिल 1944 रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. वडिलांनी मुलाला रसायनशास्त्र ऑनर्स शिकवीले. शिक्षणानंतर मुलाला सरकारी नोकरी लागली. लग्न झाले आणि घरात एक सुंदर मुलगी झाली. करसन भाई पटेल यांनी मुलीचे नाव निरुपमा ठेवले. त्याचे आपल्या मुलीवर खूप प्रेम होते. ते तिला प्रेमाने निरमा म्हणायचे. पण वडील आणि मुलीचे हे प्रेम फार काळ टिकू शकले नाही. निरमाचा अपघाती मृत्यू झाला. आणि, करसनभाईंसाठी त्यांची मुलगी फक्त आठवणींचा भाग बनून राहिली. करसन भाई पुरते कोलमडून गेले. आपली मुलगी निरमा हिने खुप शिकावे आणि जगभर प्रसिद्ध व्हावे अशी त्यांची इच्छा होती, पण लहान वयातच तिचे निधन झाल्याने हे स्वप्न अधुरेच राहिले.

असा सुरू झाला निरमाचा प्रवास

एक दिवस अचानक त्याच्या मनात विचार आला की आपल्या मुलीच्या नावाने कंपनी का सुरू करू नये. जेणेकरून जगभरातील लोकांना निरमाबद्दल माहिती होईल. रसायनशास्त्राचे विद्यार्थी करसन भाई यांनी घराच्या मागील अंगणात डिटर्जंट बनवण्यास सुरुवात केली. अनेकवेळा अयशस्वी झाले, पण शेवटी त्यांनी फॉर्मुला शोधून काढला. त्यांनी वॉशिंग पाउंडरचे नाव त्यांच्या मुलीच्या नावावर ठेवले ‘निरमा’. मुलीच्या मोहात निरमाने वॉशिंग पावडरचा पाया रचला होता, पण आता तिला प्रसिद्ध करणेही तितकेच आव्हानात्मक होते. त्यावेळी इतर वॉशिंग पावडर बाजारात आधीपासूनच लोकप्रिय होत्या, ज्यांची किंमत 15 रुपये प्रति किलो होती. त्यावेळी हिंदुस्थान लिव्हरचे ‘सर्फ’ आणि काही विदेशी ब्रँडचे वॉशिंग पावडर विकले जात होते. परंतु, महागाईमुळे ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे होते. सामान्य लोकं साबण वापरायचे, तोही स्वस्त.

हे सुद्धा वाचा

सायकवरून सुरू केली विक्री

करसन भाईंनी सरकारी नोकरी सोडून स्वतःच्या सायकलवर निरमा वॉशिंग पावडर विकायला सुरुवात केली. ते स्वत: सायकलवर डिटर्जंट पावडरची पाकिटे घेऊन घरोघरी फिरायचे, विकायचा प्रयत्न करायचे. लोकांना आश्वस्त करण्यासाठी ते प्रत्येक पाकिटामागे कपडे साफ न केल्यास पैसे परत करेल अशी हमी देत असे. त्यांनी लोकांना बाजारापेक्षा 4 पट कमी दराने डिटर्जंट विकण्यास सुरुवात केली. ते निरमा वॉशिंग पावडर फक्त तीन रुपये किलो दराने विकत होते. कमी किंमत आणि चांगली गुणवत्ता यांनी त्यांचा प्रभाव दाखवला आणि त्यांचा फॉर्म्युला हिट ठरला. काही दिवसातच निरमा मध्यमवर्गीय ते निम्न मध्यमवर्गीयांची पहिली पसंती बनली.