भारतात डिजिटल पेमेंटचा बोलबाला आहे. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत कोणत्याही खरेदीसाठी युपीआयचा सर्रास वापर होत आहे. भाजीपाल्यापासून ते इलेक्ट्रिक वस्तूपर्यंत डिजिटल पेमेंटचा वापर करण्यात येतो. ऑनलाईन शॉपिंगसाठी ऑनलाईन पद्धतींचा वापर होतो. पण भारतात Apple च्या कर्मचाऱ्यांना वेगळाच अनुभव येत आहे. आयफोन सारखा महागडा आणि स्मार्टफोन खरेदीत भारतीय मागे नाहीत. पण पेमेंट करताना ग्राहक डिजिटल पेमेंटचा वापर न करता रोखीचा वापर करत आहे. नोटा मोजण्यातच ॲप्पलच्या कर्मचाऱ्यांचा मोठा वेळ खर्ची पडत आहे. देशात मुंबई आणि दिल्लीतील ॲप्पल स्टोरमध्ये आता नोटा मोजण्याच्या मशीनचा वापर होत आहे.
रोखीत व्यवहार
भारतात डिजिटल व्यवहारांची संख्या वाढली आहे. सोबतच बाजारात रोखीचा व्यवहार पण वाढला आहे. मार्च 2017 मध्ये 13.35 लाख कोटींचे रोखीत व्यवहार झाले. मार्च 2023 मध्ये हा आकडा वाढून तो 35.15 लाख कोटींच्या घरात पोहचला. देशात UPI च्या माध्यमातून डिजिटल पेमेंट वाढले आहे. पण रोखीतील व्यवहारात कसलीच कमी आलेली नाही.
रोखीत आयफोनची खरेदी
टाईम्स ऑफ इंडियाच्या एका अहवालानुसार, देशात दिल्ली आणि मुंबईत ॲप्पलचे स्टोर आहेत. यामध्ये कंपनीचे विविध उत्पादन विक्री होतात. विक्रीतील 7-9% व्यवहार हे रोखीत होतात. दिल्लीतील स्टोरमध्ये मुंबईपेक्षा अधिक रोखीत व्यवहार होतात. युरोप आणि अमेरिकेतील कंपनीच्या स्टोरमध्ये रोखीतील व्यवहार हा एक टक्क्यांहून पण कमी आहे. परदेशातील काही स्टोरमधील कॅश पेमेंट शून्यावर आहे.
ॲप्पल स्टोरमध्ये नगद चालते का?
सोशल वेबसाईट Quora वर अनेक लोक ॲप्पल स्टोरमध्ये नगद, रोखीत व्यवहार चालतात का? असा सवाल करतात. त्याला इतर अनेक जणांनी उत्तर दिले आहे. रोखीत आयफोन आणि इतर उत्पादनं खरेदी करतात का? या प्रश्नावर ज्यांनी अगोदर खरेदी केली आहे, त्यांनी उत्तर दिले आहे. भारत सरकार डिजिटल पेमेंटसाठी प्रोत्साहित करत आहे. युपीआय पेमेंट कंपन्या पण डिजिटल पेमेंटवर ऑफर देतात.
UPI पेमेंटमध्ये 50 टक्क्यांची वृद्धी
एप्रिल 2024 मध्ये युपीआय पेमेंटमध्ये वार्षिक आधारावर 50.11 टक्क्यांची वृद्धी झाली. गेल्या महिन्यात 1,330 कोटींचे युपीआय व्यवहार झाले. या दरम्यान एकूण 19.64 लाख कोटींची रक्कम हस्तांतरीत झाली. संपूर्ण आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल 2023 ते मार्च 2024 या दरम्यान 13,068 कोटींहून अधिक व्यवहार झाले. या व्यवहारात एकूण 199.95 लाख कोटींची देवाण-घेवाण झाली. गेल्या आर्थिक वर्षापेक्षा हे प्रमाण 43.68 टक्के अधिक आहे.