इनोव्हा, फॉर्च्युनर, कॅमरी सारख्या आलिशान कारवर तर अनेक जण फिदा आहेत. या कार टोयोटा ब्रँड तयार करत असला तरी त्याची जबाबदारी किर्लोस्कर समूहाकडे आहे. या टोयोटा-किर्लोस्कर मोटारची कमान टाटा कुटुंबाच्या सूनेच्या हाती आहे. ही सून लाईमलाईटपासून कोसो दूर आहे. टाटा कुटुंबाची ही सून कोट्यवधीची उलाढाल असलेल्या कंपनीची मालकीण आहे. मानसी किर्लोस्कर-टाटा हिच्या खांद्यावर एकुलती एक असल्याने किर्लोस्कर समूहाची जबाबदारी आहे.
नोएल टाटा उत्तराधिकारी
रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांनी सर्वानुमते नोएल टाटा यांची त्यांचा उत्तराधिकारी म्हणून निवड केली होती. त्यांच्या खाद्यांवर टाटा ट्रस्टची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची सून मानसी किर्लोस्कर टोयोटा किर्लोस्कर मोटारची जबाबदारी सांभाळत आहे. मानसी नोएल टाटा यांचा एकुलता एक मुलगा नेविल टाटा याची पत्नी आहे. ती 13,488 कोटींच्या कार कंपनीची मालकीण आहे.
मानसी समूहाची उपाध्यक्ष
मानसी Toyota Kirloskar Motor-TKM समूहाची उपाध्यक्ष आहे. तिचे वडील विक्रम किर्लोस्कर यांच्या निधनानंतर कंपनीची जबाबदारी तिच्या खांद्यावर येऊन ठेपली आहे. टाटा कुटुंबातील पिढीत तिच्या इतका अनुभव कुणाकडेच नाही. ती बिझनेस आणि कॉर्पोरेट जगतात अनेक वर्षांपासून आहे. तिने 2019 मध्ये रतन टाटा यांचे चुलत भाऊ नोएल टाटा यांचा मुलगा नेविल टाटा याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. हे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने झाले होते. या लग्नानंतर ती टाटा कुटुंबाची सून झाली.
मानसी टाटा किर्लोस्कर सिस्टम लिमिटेडची (Kirloskar Systems Ltd) जबाबदारी सांभाळते. किर्लोस्कर सिस्टम लिमिटेडची ती कार्यकारी संचालक आणि सीईओ आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 13488 कोटी रुपयांच्या घरात आहे. किर्लोस्कर ब्रदर्स ( KBL),किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड (KIL),किर्लोस्कर फेरम इंडस्ट्रीज लिमिटेड( KFIL), किर्लोस्कर ऑईल इंजिन लिमिटेड (KOIL), किर्लोस्कर न्यूमेटिक कंपनी लिमिटेड ( KPCL), किर्लोस्कर इलेक्ट्रिक लिमिटेड ( KECL), एनवायर इलेक्ट्रोडाईन लिमिटेड और जीजी दांडेकर मशीन वर्क्स लिमिटेडचा सर्व कारभार तिच्या हाती आहे.