बाजारात अनेक प्रकारच्या बिअर मिळतात. वेगवेगळे ब्रँड्स त्यांच्या खास चवीसाठी नावाजलेले जातात. त्या त्या बिअरच्या चवीचा एक खास चाहता वर्ग असतो. वीकेंड पार्टीला काही जण अमूक एकच बिअरसाठी आग्रही असतात. पण बाजारात एक अनोखा बिअर ब्रँड आलेला आहे. ही कंपनी मानवी मुत्रापासून बिअर तयार करते हे तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा बिअरची बॉटल खरेदी करण्यापूर्वी हे नाव जरूर वाचून घ्या…
कशी सुचली कंपनीला ही कल्पना
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या कंपनीला ही कल्पना सुचली तरी कशी? तर वर्ष 2017 मध्ये ही कंपनीला ही कल्पना सुचली. खरंतर यामागे पाणी बचत करण्याचे कारण पुढे आले आहे. ही कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी कंपनीने उत्तर युरोपमध्ये पहिला प्रयोग केला. येथील सर्वात मोठ्या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये त्यांनी खूप टॉयलेटची निर्मिती केली. याठिकाणी त्यांनी मानवी मूत्र जमा केले. या कार्यक्रमातून त्यांनी जवळपास 50 हजार लिटर मूत्र जमा केले. त्याआधारे बिअर तयार करण्यात आली. या कंपनीला ही बिअर बाजारात विकण्याची परवानगी तिथल्या सरकारने दिली आहे.
या बिअरचे नाव तरी काय?
ही बिअर सिंगापूरची एक कंपनी तयार करते. सिंगापूरमध्ये ही बिअर तयार करण्यात येते. त्यानंतर ती स्थानिक बाजारातच नाही तर इतर देशांमध्ये पण पाठवण्यात येते. आता तुम्हाला या बिअरच्या नावाविषयी उत्सुकता लागली असेल. नाही का? जगभरात या बिअरला ‘न्यूब्रू’ वा नोरब्रो (Norrebro Beer) या नावाने ओळखले जाते. तुम्हाला बिअर घेताना हे नाव वाचावं लागेल. नाहीतर कदाचित एखादी अशी बिअर तुमच्या पुढ्यात येईल हे सांगता येत नाही. अर्थात ही बिअर भारतात विक्री होते की नाही, हे काही समोर आलेले नाही.
पाणी बचतीसाठी फॉर्म्युला
The State Times नुसार, सिंगापूरच्या या कंपनीने पाण्याची बचत करण्यासाठी हे पाऊल टाकलं आहे. बिअर तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. सिंगापूर पाणी टंचाईचा सामना करत आहे. येत्या काही वर्षात या देशात पाणी टंचाईचे संकट अजून गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळेच नोरब्रो बिअर तयार करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यात आली आहे. अर्थात या बिअरची चव आणि वास याविषयीची माहिती समोर आलेली नाही. संपूर्ण प्रक्रिया आणि चाचण्यांमधून गेल्यानंतरच ही बिअर विक्रीसाठी बाहेर येते.