शेअर बाजार नाही तर येथे पैशांचा छापखाना; गुंतवणूकदारांची सोन्यासारखी कमाई, तुम्ही ट्राय केले की नाही?

| Updated on: Dec 11, 2024 | 3:59 PM

Share Market Investors : शेअर बाजारात चढउताराचे सत्र सुरू आहे. काही दिवस तेजीच्या लाटेवर स्वार होणार शेअर बाजार अचानक धडाम आपटल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. गुंतवणूक वाढावी आणि फायदा वाढवण्यासाठी आता या ठिकाणी बड्या गुंतवणूकदारांनी पैसा ओतला आहे.

शेअर बाजार नाही तर येथे पैशांचा छापखाना; गुंतवणूकदारांची सोन्यासारखी कमाई, तुम्ही ट्राय केले की नाही?
गोल्ड ईटीएफ
Follow us on

शेअर बाजारात चढउताराचे सत्र सुरू आहे. काही दिवस तेजीचे आणि मग एकदाच मोठा फटका बसत असल्याने गुंतवणूकदारांनी इतर पर्यायांवर लक्ष केंद्रीत केले आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या ताज्या आकड्यांनुसार, गुंतवणूकदारांनी नोव्हेंबर
2023 ते नोव्हेंबर 2024 या दरम्यान गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक वाढवली आहे. एका वर्षात सोन्यातील गुंतवणूक तिप्पट झाली आहे. सोन्याच्या दागिन्यात नाही तर गोल्ड ईटीएफमध्ये (Gold ETF) गुंतवणूक वाढली आहे. फिजिकल सोन्यापेक्षा ऑनलाईन गुंतवणूक वाढली आहे. त्याचा फायदा पण दिसून आला आहे.

काय सांगते आकडेवारी?

AMFI च्या आकड्यावर नजर टाकली तर ही बाब स्पष्ट होते. या एका वर्षात 1,256 कोटींचा गोल्ड ईटीएफ खरेदी करण्यात आला. तर गेल्यावर्षी हा आकडा 333.37 कोटी रुपये इतका होता. मनीकंट्रोलच्या एका वृत्तानुसार, मॉर्निंगस्टार इन्वेस्टमेंट रिसर्च इंडियाचे सहाय्यक संचालक हिमांशु श्रीवास्तव यांच्या मते, गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफमध्ये फायदा शोधत आहेत.

हे सुद्धा वाचा

आतापर्यंत 25,409 कोटींची गुंतवणूक

जानेवारी 2020 पासून आतापर्यंत गोल्ड ईटीएफमध्ये एकूण 25,409 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. हा शेअर बाजाराकडून ईटीएफकडे वळालेला ट्रेंड दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोबरच्या तुलनेत कमी रक्कम जमा झाली. तर जास्त रक्कम काढण्यात आली. याचा अर्थ सोने महाग झाल्यावर गुंतवणूकदारांनी विक्री केली तर किंमती घसरल्यावर खरेदी वाढवली. आता लग्नसराईचा हंगाम असल्याने सोन्याचे दाग-दागिने, आभुषणांची खरेदी वाढली आहे.

पेपर गोल्डचा जबरदस्त पर्याय

सध्या गुंतवणूकदार गुंतवणूकीसाठी पेपर गोल्ड हा एकदम जबरदस्त पर्याय आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूकदारांकडे काय काय पर्याय आहेत. तर डिजिटल गोल्डमध्ये ग्राहकांसमोर सॉव्हेरिन गोल्ड बाँड, गोल्ड ईटीएफ, गोल्ड म्युच्युअल फंड असे अनेक पर्याय आहेत.

गोल्ड ETF चा पर्याय

गोल्ड ईटीएफ सारखे फंड तुम्हाला मालामाल करू शकतात. नियमित शेअर अथवा स्टॉक एक्सचेंजवर तुम्ही व्यापार करू शकतात. गोल्ड ETF खरेदीसाठी तुमच्याकडे डीमॅट खातं असणं अत्यंत आवश्यक आहे. सध्या निप्पॉन इंडिया गोल्ड ETF, HDFC गोल्ड ETF अथवा ICICI प्रुडेन्शियल गोल्ड ईटीएफ सारखे लोकप्रिय गोल्ड ईटीएफ बाजारात आहेत. तुम्ही स्वतः ऑनलाईन सर्च करून अथवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गुंतवणूक करू शकता.