देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती अनंत अंबानी आज 29 वर्षांचा झाला. लवकरच तो राधिका मर्चेंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात त्यांच्या प्री-वेडिंगचा सोहळा उभ्या जगाने पाहिला. अनंत याच्यापेक्षा ईशा आणि आकाश तीन वर्षांनी मोठे आहे. ईशा आणि आकाश हे जुळे आहेत. ते दोघे सध्या 32 वर्षांचे आहेत. या तिघांमध्ये चांगले ट्युनिंग आहे. किती आहे अनंत अंबानी याची कमाई?
तिघे जण रिलायन्सच्या संचालक मंडळात
- उद्योगपती मुकेश अंबानी यांनी तरुणपणीच मुलांना व्यवसायाचे बाळकडू पाजले. जवळपास 8 वर्षांपूर्वी रिलायन्स जिओ लाँच करण्यात आले होते. त्यामध्ये आकाश आणि ईशाने मोठी जबाबदारी निभावली. तर अनंत अंबानी सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये नू एनर्जी, अक्षय ऊर्जा व्यवसायावर लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यांनी वनतारा हा प्रकल्प राबविला. त्यावर तो तरुण वयापासूनच काम करत आहे.
- हे तिघे बहिण-भाऊ रिलायन्स समूहाच्या संचालक मंडळात दाखल झाले आहेत. ईशा सध्या रिटेल व्यवसायावर लक्ष देत आहे. आकाशकडे जिओ प्लॅटफॉर्मची जबाबदारी आहे. अनंत याच्याकडे नव्या दमाचा व्यवयास, अक्षय उर्जेचा पर्याय आला आहे. पण कमाईच्या बाबतीत अनंत अंबानी ईशाला टक्कर देतो हे तुम्हाला माहिती आहे का?
ईशा-आकाश आणि अनंतचे वेतन
- मीडिया वृत्तानुसार, ईश अंबानी हिच्याकडे रिलायन्स रिटले, रिलायन्स जिओ, रिलायन्स फाऊंडेशन आणि धीरुभाई इंटरनॅशनल स्कूलची जबाबदारी तिच्यावर आहे. त्यासाठी ती वार्षिक जवळपास 4.2 कोटी रुपयांचा पगार घेते. रिलायन्स समूहातील शेअर्स आणि डिव्हिडंडचा फायदा यामध्ये गृहित धरण्यात आलेला नाही.
- कमाईच्या बाबतीत छोटा भाऊ अनंत पण मागे नाही. रिलायन्स समूहाच्या अक्षय ऊर्जाचा व्यवसाय, ग्रीन एनर्जीचा व्यवसायाची जबाबदारी अनंतकडे आहे. याशिवाय त्याच्याकडे जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडची पण जबाबदारी आहे. त्याची वार्षिक कमाई जवळपास 4.2 कोटी रुपये आहे. अनंत अंबानी याची स्वतःची संपत्ती जवळपास 3,32,482 कोटींच्या घरात आहे.
- अनंत अंबानी याचा मोठा भाऊ आकाश अंबानी हा देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ इंफोकॉमचा संचालक आहे. याशिवाय तो रिलायन्स रिटेल व्हेंचर्स आणि जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचा संचालक आहे. त्याची कमाई दोघांपेक्षा अधिक आहे. तो वर्षाला 5.4 कोटी रुपये कमावतो.