नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अलिकडेच ‘नो युवर कस्टमर’ (KYC) च्या सूचना सुधारल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ-आधारीत कस्टमर आयडेंटिफिकेशन प्रोसेस (V-CIP) सुरू केली गेली आहे. रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार केवायसीचे अपडेटेशन पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. बँका आता सोप्या पद्धतीने त्यांच्या ग्राहकांचे केवायसी करीत आहेत. काही बँकांनी व्हिडीओद्वारे केवायसी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने आपल्या सदस्य बँकांना केवायसीसाठी आता सक्ती करण्याची गरज नसल्याचे निर्देश दिले होते. ज्या लोकांचे कोरोना अपडेटेशन प्रलंबित आहे, त्यांच्या विरोधात 31 डिसेंबर 2021 पर्यंत त्यांच्यावर कठोर कारवाईचे न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने नरमाईची भूमिका घेतली आहे. केवायसीसाठी लोकांना बँकेत जावे लागेल. लॉकडाउन आणि कर्फ्यू पाहता यावर अद्याप बंदी आहे. मात्र ईमेलद्वारे व्हिडिओ केवायसी सुरू केले गेले आहे. ज्या ग्राहकांना इच्छा आहे ते याद्वारे केवायसी अपडेट करू शकतात. (Now bank work will be done at home, changes in the rules of KYC, know what the RBI said)
व्हिडिओ-आधारीत ग्राहक ओळख प्रक्रियेस व्हिडिओ-केवायसी म्हटले जाते. हे नवीन खाते उघडण्यासाठी किंवा जुन्या ग्राहकांच्या केवायसी अपडेट करण्यासाठी वापरले जाऊ शकते. जर कोणी नवीन कंपनी उघडली तर ऑथराईज्ड सिग्नेटरी आणि कायदेशीर कंपनीच्या मालकांना व्हिडिओ केवायसीची सुविधा देखील मिळते. या पद्धतीद्वारे ग्राहकांचे व्हिडिओ आणि ऑडिओद्वारे ओळख पटवली जाते. सुरक्षित नेटवर्कद्वारे लाईव्ह मिटिंग होते आणि केवायसी प्रक्रिया ग्राहकांशी बातचीत करुन पूर्ण केली जाते. व्हिडिओ चॅट दरम्यान बँक अधिकाऱ्यांकडून ग्राहकांची वैयक्तिक माहिती घेतली जाते. या व्हिडिओ केवायसीमध्ये बँक आणि ग्राहक यांच्यात शून्य शारीरिक संपर्क असतो, मात्र काम सुरक्षित पद्धतीने पूर्ण केले जाते.
व्हिडिओ केवायसी बँकेची वेबसाईट किंवा बँकेच्या मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे होते. व्हिडिओ केवायसी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ग्राहक बँकेची वेबसाइट किंवा मोबाईल अॅप्लिकेशन लॉग आउट करू शकत नाही. ग्राहक केवायसीला आपली संमती देते, ती बँक आपल्याकडे पुराव्यांच्या आधारे ठेवते. व्हिडिओ रेकॉर्डिंग जीपीएसशी जोडलेले असते आणि त्यावर वेळे आणि तारखेचा शिक्का असतो. जर मध्येच तांत्रिक समस्या आली तर केवायसी व्हिडिओ थांबवून नवीन सेशन सुरू केले जाते. हे झूम, व्हाट्सएप आणि स्काईप सारख्या थर्ट पार्टी व्हिडिओ कॉलिंगला अनुमती देत नाही.
बँका वेळोवेळी जोखीमीच्या आधारे ग्राहकांचे केवायसी अपडेट करतात. उदाहरणार्थ, बँकेच्या दृष्टिकोनातून एखादा हाय रिस्क असलेला ग्राहक असल्यास, दर 2 वर्षात किमान एकदा केवायसी अपडेट असणे आवश्यक आहे. जर ग्राहक मध्यम जोखीम प्रकारात असेल तर 8 वर्षातून एकदा तरी केवायसी अपडेट आवश्यक आहे. कमी जोखीम घेणा-या ग्राहकांसाठी केवायसी प्रक्रिया 10 वर्षानंतर एकदाच अवलंबली जाऊ शकते. खाते उघडले त्या वर्षापासून अपडेट करण्याचे वर्ष व तारीख निश्चित केली जाते.
आरबीआयने बँकांना आणखीन अनेक मार्गांनी केवायसी अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोना महामारी लक्षात घेता, ग्राहक बँकेत जाऊ नका आणि ग्राहक घरबसल्या हे काम करु शकतील यासाठी नवनवीन मार्ग सांगितले आहेत. आपण केवायसीसाठी नोंदणीकृत ईमेल, टपालपत्र, मोबाईल बँकिंगद्वारे सेल्फ डिक्लेरेशन जमा करू शकता. अशा परिस्थितीत ग्राहकांना केवायसी अपडेटसाठी बँक शाखेत जाण्याची गरज नाही. (Now bank work will be done at home, changes in the rules of KYC, know what the RBI said)
Video | डोक्याला बाशिंग, बाजुला नवरी, नवरदेवाने वाजवला असा ताशा की लोक झाले फॅन, व्हिडीओ व्हायरल https://t.co/xaLxWD3ACT#Video | #viral | #ViralVideo | #marriiage | #groom| #groom
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 12, 2021
इतर बातम्या
समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांची प्रकृती चिंताजनक, पुढील 48 तास महत्वाचे
Bank of Baroda ची पॉझिटिव्ह पे सिस्टीम, आता फसवणुकीचा धंदा बंद, बँकिंग व्यवहार होणार पारदर्शक