आर्थिक वर्ष 2023-24 आणि मूल्यांकन वर्ष 2024-25 संदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. करदात्यांना त्यांचा कर भरणा करता येणार आहे. या वर्षीपासून अगोदरच फॉर्म इनेबल करण्याचा पायंडा आयकर खात्याने पाडला आहे. आर्थिक वर्ष सुरु होताच हे फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. इतर अनेक सोयी-सुविधा पण वाढविल्या आहेत. त्यामुळे आयकर वेळेत भरण्यात तांत्रिक अडचण वगळता पुरेसा वेळ न मिळाल्याचे कारण देता येणार नाही. आयकराचा भरणा करण्यासाठी आयकर विभागाने आयकर रिटर्न फॉर्म 1 एप्रिल 2024 पासून इनबेल केले आहेत.
हे आहेत अर्ज
आर्थिक वर्ष 2023-24 आणि मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी आयकर खात्याने आयटीआर -1, आयटीआर – 2, आयटीआर – 4 हे फॉर्म इनेबल केले आहेत. आयकर भरण्यासाठी करदात्यांन त्याचा वापर करता येईल. प्राप्तिकर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024 ही आहे.
आर्थिक वर्षांपासूनच श्रीगणेशा
यापूर्वी आयकर विभाग नवीन आर्थिक वर्ष सुरु झाल्यानंतर एप्रिल महिन्यात इनकम टॅक्स रिटर्न फॉर्म नोटिफाय करत होता. पण यंदा लवकरच फॉर्म नोटिफाय करण्यात आले आहेत. नवीन वर्ष सुरु होताच आयकर विभागाने ऑनलाईन आणि ऑफलाईन आयकर रिटर्न फॉर्म इनबेल केले आहेत. त्यामुळे करदात्यांना आयकर रिटर्न दाखल करता येणार आहे.