Alert! पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असेल तर वेळीच करा ‘हे’ काम, नाहीतर बसेल दंड

| Updated on: Nov 30, 2020 | 11:06 PM

पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यात 500 रुपये नसतील तर खातेदारांकडून दंड आकारला जाईल. ( post office account balance)

Alert! पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असेल तर वेळीच करा हे काम, नाहीतर बसेल दंड
या योजनेत नाव नोंदण्यासाठी पीओएमआयएसचा फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म भरत असताना तुम्हाला ओळखपत्र, निवासी पुरावा, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक असणार आहेत.
Follow us on

नवी दिल्ली : जर पोस्ट ऑफिसमध्ये तुमचं बचत खातं (Saving Accounts) असेल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. खरंतर, पोस्ट ऑफिसने (Post Office) सेव्हिंग खात्यात किमान पैसे शिल्लक ठेवणं बंधनकारक केलं आहे. त्यामुळे 12 डिसेंबर 2020 पासून हा नवीन नियम अंमलात येणार असल्याची माहिती पोस्ट खात्याकडून देण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर बचत खात्यात 500 रुपये नसतील तर खातेदारांकडून दंड आकारला जाईल. इंडिया पोस्टनुसार (India Post), पोस्ट ऑफिस बचत खातेधारकांना बचत खात्यात किमान 500 रुपये ठेवावे लागणार आहेत. (now in post office savings account maintain minimum balance in is mandatory)

किमान 500 रुपये शिल्लक ठेवणं बंधनकारक

इंडिया पोस्टने ट्विटरवरुन यासंबंधी महत्त्वाची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहलं की, 11.12.2020 नंतर, पोस्ट ऑफिस बचत खात्यावर लागू होणारे सांभाळ शुल्क टाळण्यासाठी, तुमच्या खात्यात किमान 500 रुपयांची अतिरिक्त रक्कम ठेवा. अन्यथा आर्थिक वर्षाअखेरीस खात्याच्या सांभाळ करण्याच्या नावाखाली तुमच्या खात्यातून 100 रुपये वजा केले जातील.

100 रुपये सांभाळ शुल्क होईल वजा

इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटनुसार, तुमच्याकडे आर्थिक वर्षाच्या शेवटी बचत खात्यात किमान 500 रुपये शिल्लक नसतील तर मेनटेनंन्स शुल्क म्हणून 100 रुपये वजा केले जातील. इतकंच नाही तर जर बचत खात्यात जमा केलेली रक्कम शून्य झाली तर ते खातं बंद देखील केलं जाईल.

कोण उघडू शकतं खातं ?

पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं एक प्रौढ व्यक्तीद्वारे किंवा दोन प्रौढ व्यक्तींचे मिळून किंवा एखाद्या लहान मुला-मुलीचे किंवा पालकांचे असे उघडता येते. 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचेही खाते उघडले जाऊ शकते. तर एका व्यक्तीकडून फक्त एक बचत खाते उघडता येते. (now in post office savings account maintain minimum balance in is mandatory)

किती व्याज मिळणार?

पोस्ट ऑफिस बचत खात्यामध्ये सध्या 4 टक्के व्याज दर आहे. जो बँकांपेक्षा जास्त आहे. दहाव्या आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेच्या दरम्यान किमान शिल्लक रकमेच्या आधारे व्याज मोजले जातं. पोस्ट ऑफिस वेबसाइटनुसार, महिन्याच्या दहाव्या आणि शेवटच्या दिवसाच्या दरम्यान जर शिल्लक रक्कम 500 रुपयांपेक्षा कमी असेल तर त्या महिन्यात कोणतेही व्याज दिले जाणार नाही.

इतर बातम्या –

विलीनीकरणानंतर लक्ष्मीविलास बँकेच्या ग्राहकांना किती मिळणार व्याज? DBS ने बँकेने दिली माहिती

Bank Holidays in December 2020 | बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या, डिसेंबरमध्ये तब्बल 14 दिवस बँका बंद

Aadhaar किंवा PAN कार्डवर चुकीचे नाव आहे? नाव दुरुस्त करण्याच्या सोप्या स्टेप्स

(now in post office savings account maintain minimum balance in is mandatory)