नवी दिल्ली : कच्चा तेलाने एक्सीलेटर दाबल्याने किंमती झरझर वाढल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाने (Crude Oil) भरारी घेतली आहे. अमेरिका आणि युरोपला धडा शिकवण्यासाठी ओपेकसह (OPEC+) रशियाने खेळी खेळली. अचानक तेल उत्पादन घटविण्याचा फैसला त्यांनी जाहीर केला. या आठवड्याच्या सुरुवातीला हा निर्णय घेतला. त्याचा फटका आता सर्वच अर्थव्यवस्थांना बसणार आहे. चीनने मोठ्या प्रमाणात मागणी वाढवल्याने आणि दुसरीकडे उत्पादनात कपात केल्याने कच्चा तेलाचे भाव वधारले. कच्चा तेलाने भरारी घेतल्यापासून अनेक देशांना उद्याची फिक्र पडली आहे. सोशल माध्यमातून तर पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) थेट 150 रुपये प्रति लिटरच्या घरात जाणार असल्याचा दावा ठोकण्यात येत आहे. खरंच असं होणार आहे का?
आज काय किंमत
आज रविवारी, 9 एप्रिल रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 80.70 डॉलरवर पोहचल्या. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 85.12 डॉलर प्रति बॅरलवर आहे. या दरवाढीमुळे देशातील काही शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदलल्या आहेत. काही राज्यात इंधन स्वस्त तर काही शहरात इंधनाचे दर वाढले आहेत.
काय आहे स्थिती
ओपेक संघटनेने मार्च महिन्याचे बुलेटिन जाहीर केले आहे. त्यात मार्चच्या दुसऱ्या पंधरवाड्यात जगभरातून कच्चा तेलाची मागणी घटल्याचा दावा करण्यात आला आहे. पहिल्या पंधरवाड्यात मागणी जास्त होती. पण या महिन्याच्या सुरुवातीला मागील महिन्याशी, मार्चशी तुलना करता 70,000 बॅरल प्रति दिवसाने कच्चा तेलाची मागणी वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात 101.28 दशलक्ष बॅरल प्रति दिवस तर दुसऱ्या आठवड्यात ही मागणी 100.77 दशलक्ष बॅरल प्रति दिवसांवर आली.
चीनमध्ये मोठी मागणी
जगात चीनसह अनेक देशात या वर्षात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले होते. त्यामुळे या देशात निर्बंध आले होते. परिणामी कच्चा तेलाचे उत्पादन जास्त आणि मागणी कमी अशी परिस्थिती होती. त्यामुळे अनेक देशाचा तेल साठा वाढला होता.
पेट्रोल-डिझेल 150 रुपयांच्या घरात जाणार?
तर सोशल मीडियावर आतापासूनच पेट्रोल-डिझेल 150 रुपयांच्या घरात जाणार असल्याच्या बातम्यांनी धुमाकूळ घातला आहे. अमेरिकेसह दोस्त राष्ट्रांनी नरमाईची भूमिका घेतल्यास आता असलेल्या दबावतंत्राला आळा बसू शकतो. तर रशियाने जर भारताला कमी किंमतीत इंधन पुरवठा केल्यास किंमतीत फार मोठी वाढ होण्याची शक्यता नाही. जर तरच्या या गणितात कुठलाच तोडगा निघाला नाहीतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होईल. पण ती साधारणतः 10-12 रुपयांच्या घरात असेल.
उत्पादन घटवले
राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)