Apple कंपनीला या AI कंपनीने टाकले मागे, बनली सर्वात मोठी कंपनी

| Updated on: Nov 06, 2024 | 9:01 PM

जगातील सर्वात मोठ्या कंपन्या अमेरिकेत आहे. आतापर्यंत आयफोन तयार करणारी एप्पल कंपनी सर्वात मोठी कंपनी ( बाजारमुल्य ) मानली जात होती. परंतू एका एआय कंपनीने हा मान हिरावून घेत ती आता सर्वात मोठी कंपनी बनली आहे.

Apple कंपनीला या AI कंपनीने टाकले मागे, बनली सर्वात मोठी कंपनी
Follow us on

आता जर तुम्हाला कोणी विचारले की जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती तर आयफोन बनविणारी एप्पल कंपनी असे उत्तर देऊ नका ? का कारण या जागी आता नवीन कंपनीने जागा घेतली आहे. एनवीडिया ( Nvidia Corp ) ही कंपनी आता जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. कारण या कंपनीचे बाजारातील मूल्य सर्वाधिक बनले आहे. परंतू ही कंपनी देखील अमेरिकनच आहे. त्यामुळे जागतिक कंपन्यांमध्ये अमेरिकेचा दबदबा कायम आहे.

कशी झाली सर्वात मोठी कंपनी ?

कृत्रिमबुद्धीमत्ता म्हणजे आर्टीफिशियल इंटेलिजन्स (AI) सेक्टरमध्ये काम करणारी ही कंपनी आहे. मंगळवारी एप्पल कंपनीला पछाडत एनवीडीया जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. कारण या कंपनीचे बाजारमुल्य सर्वात जास्त बनले आहे.

आर्टीफिशियल इंटेलिजन्स (AI) सेक्टरमध्ये काम करणाऱ्या Nvidia कंपनीच्या शेअरच्या भावात 2.9 टक्के वाढ झालेली आहे. यामुळे या कंपनीचे बाजारमुल्य ( मार्केट कॅप ) 3.43 लाख कोटी डॉलर इतके झालेले आहे. ही रक्कम भारताच्या अर्थव्यवस्थे एवढी आहे. तर एप्पल कंपनीचे बाजार मूल्य 3.38 लाख कोटी डॉलर  झाले असून ते  एनवीडीया पेक्षा कमी झाले आहे.

या आधी एनव्हीडिया कंपनीने मायक्रोसॉफ्ट (Microsoft Corp) कंपनीला मागे टाकले होते. मायक्रोसॉफ्टचा मार्केट कॅप ( बाजारमुल्य ) 3.06 लाख कोटी डॉलर आहे. या बाब म्हणजे एनव्हीडीया कंपनीच्या शेअऱमध्ये साल 2022 अखेरपासून आतापर्यंत 850 टक्क्यांपर्यंत वाढ झालेली आहे.

आधीही मिळाला होता मान पण…

सध्या S&P 500 इंडेक्स ( एक प्रमुख शेअर निर्देशांक ) मध्ये एनवीडीयाचा 7 टक्क हिस्सा आहे. आणि या निर्देशांकाच्या 21 टक्के वार्षिक वाढीतील एक चतुर्थांश हिस्सा एनवीडीयामुळे आहे. जूनमध्येही एनवीडीयाने सर्वात मोठी कंपनीचा मान मिळविला होता. परंतू तो केवळ एक दिवसासाठी होता.