नवी दिल्ली : देशात कंपन्या फायद्यात आहेत. पण नागरिकांना जादा दराने पेट्रोल-डिझेल खरेदी करावे लागत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे इथेनॉलचा प्रयोग करण्याचा मनसुबा मांडत आहे. तर देशभरात पुन्हा हजारो पेट्रोल पंप उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी दोन दिवसांपूर्वी देशातील कानाकोपऱ्यात याविषयीची जाहिरात दिली आहे. केंद्रीय पातळीवर किती गोंधळाची स्थिती आहे, हे यातून स्पष्ट होते. विरोधी पक्ष मोट बांधण्यात व्यस्त आहेत. नागरी समस्या आणि लोकांच्या अडचणींवर त्यांची धार बोथट झाली आहे. नागरिकांच्या रोष आणि नाराजीनंतर केंद्र सरकार आता पेट्रोल-डिझेल कधी स्वस्त करणार याकडे सर्वसामान्यांचे डोळे लागले आहे. तेल कंपन्यांनी सकाळीच पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol Diesel Price) जाहीर केला. राज्यातील काही शहरात इंधनाची किंमत वाढली तर काही या ठिकाणी झाले स्वस्त. जाणून घ्या काय आहे भाव
क्रूड ऑईलची झेप
आज 2 जुलै रोजी सकाळी 6 वाजता पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे भाव जाहीर केले. जागतिक बाजारात कच्चा तेलात चढउतार आहे. आज कच्चा तेलाने झेप घेतली. ब्रेंट क्रूड ऑईल 75.41 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलचा भाव 70.64 डॉलर प्रति बॅरल झाला.
राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)
केंद्र आणि राज्य सरकार कमाईतून गब्बर
एक लिटरवर इतका नफा
गेल्या वर्षभरापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा फरक दिसलेला नाही. बाजारात तेलाच्या किंमतीत मामूली बदल दिसतो. जवळपास 345 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत दिसलेली नाही. एका अहवालानुसार, तेल कंपन्यांना प्रति लिटर 10 रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे.