नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलात सातत्याने चढउतार होत आहे. 22 जून रोजी कच्चा तेलाने (Crude Oil Price) उसळी घेतली होती. बेंच मार्क ब्रेंट क्रूड ऑईल 77.04 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलचा भाव 72.47 डॉलर प्रति बॅरल झाला होता. आज 23 जून रोजी या किंमती अनुक्रमे 74.19 डॉलर प्रति बॅरल आणि 69.52 डॉलर प्रति बॅरल झाले. किंमतीत आज घसरण दिसून आली. पण गेल्या वर्षाभरापासून कच्चे तेल स्वस्ताईचा तिळमात्र फायदा भारतीय नागरिकांना मिळालेला नाही. केंद्र, राज्य सरकार आणि तेल कंपन्या मालामाल झाल्या आहेत. देशातंर्गत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price) आज असा बदल झाला. एक लिटरसाठी खिशाला इतकी झळ बसेल. भाव एका एसएमएसवर जाणून घेता येईल.
सकाळीच होतात भाव जाहीर
जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम किंमतींवर दिसून येत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळीच 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव जाहीर केले. कुठे इंधनाचे दर वाढले तर कुठे स्वस्त झाले.
केंद्र आणि राज्य सरकार कमाईतून गब्बर
तिजोरीत असा येतो पैसा
एक लिटर पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकारला करातून मोठा फायदा होतो. 23 जून रोजी एखाद्या शहरातील पेट्रोलचा भाव 96.72 रुपये असेल तर त्यात 35.61 रुपये कराचे असतात. यामध्ये केंद्र सरकारचा वाटा 19.90 रुपये तर राज्य सरकारला 15.71 रुपये मिळतात. एक लिटर पेट्रोलवर डिलरला 3.76 रुपये कमिशन मिळते. वाहतूकीसाठी 0.20 पैसा द्यावे लागतात.
एक लिटरवर इतका नफा
गेल्या वर्षभरापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा फरक दिसलेला नाही. बाजारात तेलाच्या किंमतीत मामूली बदल दिसतो. जवळपास 345 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत दिसलेली नाही. एका अहवालानुसार, तेल कंपन्यांना प्रति लिटर 10 रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे.
भाव एका SMS वर
दरात कपात
केंद्र सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर देशात पेट्रोल 8 रुपये तर डिझेल 6 रुपयांनी स्वस्त झाले होते.