नवी दिल्ली | 14 February 2024 : जगासह देशात पण सायबर फसवणुकीचे प्रकरणं वाढत आहे. प्रत्येक दिवशी देशात कोणाला ना कोणाला ऑनलाईन फसविण्यात येते. त्यामुळे त्याचा कष्टाचा पैसा चोरल्या जातो. अनेकांना मोठा आर्थिक फटका बसतो. सायबर भामटे ओटीपी मागून अथवा इतर मार्गाने फसवणूक करतात. याविरोधात अनेकदा तक्रार होतात. पण ऑनलाईन चोरलेला पैसा काही परत मिळत नाही. पण त्यावर केंद्र सरकार जालीम उपाय करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार सायबर भामट्यांना धडा शिकविण्यासाठी प्लॅन आखत आहे. सरकार बँकांच्या मदतीने नवीन मार्गदर्शक तत्वे आणण्याच्या तयारीत आहे.
काय SOP
बँका आणि आर्थिक संस्था लवकरच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भारतीय तपास यंत्रणांना आर्थिक फसवणुकीची प्रकरणांचा उलगडा करणे आणि खात्यांचा मागे काढणे सोपे होणार आहे. या प्रणालीमुळे ज्यांचा पैसा ऑनलाईन चोरी करण्यात आला आहे. तो परत करता येईल.
अर्थमंत्रालयात झाली बैठक
UPI फसवणुकीची करा तक्रार
युपीआयच्या माध्यमातून चुकीच्या खात्यात रक्कम हस्तांतरीत झाली तर लागलीच यासंबंधीची तक्रार द्या. UPI प्लॅटफॉर्मवर (फोनपे, पेटीएम, गूगल पे ) त्याची माहिती द्या. अशा युपीआय व्यवहारावर तक्रार नोंदवा. तसेच ही रक्कम रिफंड करण्याची विनंती करा. याशिवाय ग्राहकांनी राष्ट्रीय देयके महामंडळाच्या (NPCI) वेबसाईटीवर पण तक्रार करावी.