मुंबई : ई-कॉमर्स वेबसाईटवर सर्वाधिक डेबिट कार्डचा वापर केला जातो, अशी माहिती पेमेंट टेक्नॉलॉजी आणि ट्रान्जेक्शन प्रोसेसिंग कंपनी फायनेंशिअर सॉफ्टवेअर अँड सिस्टम्स (FSS) च्या अहवालातून समोर आली आहे.
एफएफएस पेमेंट्स ट्रेंड 2018 च्या अहवालानुसार, गेल्यावर्षी FSS गेटवेवर 589 मिलियन डेबिट कार्ड आणि 201.4 मिलियन क्रेडिट कार्डचा व्यवहार झाला होता. यामध्ये क्रेडिट कार्डद्वारे 10 बिलियन डॉलरचा आणि डेबिट कार्डद्वारे 8 बिलियन डॉलरचा व्यवहार आहे.
एफएफएसने 19 मोठ्या बँकासोबत मिळून यावर एक रिसर्च केला आहे. यामध्ये पेमेंट करण्यासाठी 47.5 टक्के व्हिजा, 35 टक्के मास्टरकार्ड आणि 16 टक्केपेक्षा कमी रुपे डेबिट कार्डचा वापर करण्यात आला आहे. सर्व व्यवहार पाहिले तर व्हिजाच्या वापरात वाढ झालेली दिसत आहे. गेल्यावर्षी व्हिजा 47.1 टक्के व्यवहार झाला होता.
क्रेडिट कार्डद्वारे 54.4 डॉलरचे व्यवहार करण्यात आले आहे, तर डेबिट कार्डद्वारे 13.4 डॉलरचे व्यवहार करण्यात आले आहे. डेबिट कार्ड यूजर्स फूड डिलीव्हरी, छोट्या-मोठ्या ऑनलाईन शॉपिंग इतर खर्चासाठी मोठ्या प्रमाणात डेबिट कार्डचा वापर करण्यात आला.
डिजीटल व्यवहारमध्ये सर्वाधिक वापर 291 मिलिअनसह मोबाईल वॉलेटचा करण्यात आला आहे. यानंतर ट्रॅव्हल अँड हॉटेल सेगमेन्टसाठी 140 मिलिअन व्यवहार करण्यात आले. एफएफएसचा केलेल्या दाव्यानुसार, आतापर्यंत 1.85 बिलिअन डॉलरचे व्यवहार करण्यात आले आहे.