लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन व्यवहारात वाढ, एप्रिल महिन्यात शंभर कोटींचा व्यवहार

| Updated on: May 23, 2020 | 10:05 AM

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Online Transaction increase during lockdown) आहे.

लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन व्यवहारात वाढ, एप्रिल महिन्यात शंभर कोटींचा व्यवहार
चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले तर क्षणात परत मिळतील पैसे
Follow us on

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Online Transaction increase during lockdown) आहे. या लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तुंची दुकानं वगळता इतर सर्व दुकानं बंद असल्याने अनेकजण ऑनलाईनद्वारे वस्तू मागवत आहेत. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारात वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात देशात एकूण शंभर कोटींचा व्यवहार झाल्याची माहिती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (Online Transaction increase during lockdown) दिली.

लॉकडाऊनमध्ये अनेकजण मोबाईल रिचार्ज, टेलिफोन, वीजबिल, औषध आणि अन्नधान्य खरेदी यांचे व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत देशभरातील नागरिकांनी ऑनलाईन माध्यमातून जोरदार खरेदी केली आहे.

ऑनलाईनच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. एप्रिल 2020 मध्ये तब्बल 99 कोटी 90 लाख ऑनलाईन व्यवहाराची नोंद करण्यात आली आहे. या माध्यमातून दीड लाख कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहितीही नॅशनल पेमेंट कॉपोर्रेशन ऑफ इंडियाने दिली.

कोरोनामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नोटांच्या माध्यमातून कोरोनाची लागण होईल या भीतीनेही नागरिक पेट्रोल पंप, बाजारातील दुकानात ऑनलाईन पेमेंट करत आहेत.

ऑनलाईन दारु विक्री

नुकतेच राज्यातील काही जिल्ह्यात ऑनलाईन दारु विक्री सुरु करण्यात आली आहे. दारु विक्री ऑनलाईन झाल्याचे मोठ्या प्रमाणात दारुचीही विक्री होत आहे. ऑनलाईनमध्ये घर बसल्या ग्राहकांना दारु मिळत असल्याने चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे राज्याचा महसूलही वाढणार आहे.

संबंधित बातम्या :

Shirdi Lockdown | लॉकडाऊनमध्येही साई चरणी भाविकांचं ऑनलाईन दान

ऑनलाईन दारुविक्रीला परवानगी; सलून, शॉपिंग मॉल बंद, नागपुरात कोणत्या दिवशी काय सुरु?

रत्नागिरीत घरपोच दारु, ऑनलाईन मद्य विक्रीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश