नवी दिल्ली | 8 March 2024 : आज जागतिक महिला दिन (International Women Day) आहे. बँक ऑफ बडोदाने महिलांसाठी एक खास ऑफर आणली आहे. हे खाते उघडणाऱ्या महिलांना ना केवळ स्वस्तात कर्ज मिळेल, पण इतर ही अनेक सोयी-सुविधा त्यांना मिळतील. विशेष म्हणजे या खात्यत नेहमी 25 लाख रुपयांपर्यंत रक्कम ठेवत येईल आणि तुम्हाला वाटेल तेव्हा ती काढता येईल. जर आज आई,बहिण अथवा पत्नीला गिफ्ट द्यायचे असेल तर हे खाते तुम्हाला फायदेशीर ठरु शकते.
महिला शक्ती बचत खाते
बँकेने महिलांसाठी दोन खास बचत खाती सुरु केली आहेत. महिला शक्ती बचत खाते आणि महिला पॉवर करंट खाते. येत्या 30 जून, 2024 पर्यंत या खात्याचा फायदा घेता येऊ शकतो. खाते उघडता येऊ शकते. या खातेदारांना बँकेकडून सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा मिळतील. यामध्ये 25 लाख रुपयांच्या ओवरड्राफ्टची सुविधा आहे.
इतर काय काय फायदे मिळतील
या बँकेत खाते उघडणाऱ्या महिलांना सर्व प्रकारच्य सुविधा मिळतील. कर्जावर 25 आधार अंक म्हणजे 0.25 टक्क्यांपर्यंत कमी व्याजदराने कर्ज मिळेल. तर दुचाकीसाठी पण 0.25 टक्क्यांपर्यंत कमी, शैक्षणिक कर्जावर 0.15 टक्के, कार आणि गृहकर्जावर 0.10 टक्के दराने व्याज मिळेल. बँकेचे प्रक्रिया शुल्क पण माफ होईल. तर बँकेच्या लॉकर सुविधेवर वार्षिक 50 टक्क्यांची सवलत मिळेल. या खात्यामुळे महिला सदस्याच्या नावे वाहन कर्ज, गृह कर्ज घेतल्यास मोठी सवलत मिळेल. त्यामुळे तुमची मोठी बचत होईल. कर्जावरील हप्ता कमी होईल. तसेच कमी व्याजदराने पण मोठी बचत होईल. प्रक्रिया शुल्क वाचेल. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा पण फायदा घेता येईल.