मोदींचा मंत्र आणला अंमलात, संकटात शोधली संधी अदानी यांनी
कोविड काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटात संधी शोधण्याचा देशवासीयांना मंत्र दिला होता. हा मंत्र गौतम अदानी यांनी सत्यात उतरवला. त्यांनी संकटात संधी शोधलीच नाही तर त्यातून आता ते बक्कळ कमाई पण करणार आहे. सध्या इस्त्राईल हा जगाचा केंद्रबिंदू होऊ पाहत आहे. अगोदर हमासविरोधात आणि आता इराणविरोधात इस्त्राईलने मोर्चा उघडला आहे. गाझा पट्यात युद्धाचे ढग गडद झालेले आहेत. या ठिकाणी ड्रोन्सद्वारे अनेक घडामोडींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. भारतातून सर्वाधिक ड्रोन्सची निर्यात इस्त्राईलला करण्यात आली आहे.
हैदराबाद ते गाझा
हैदराबाद येथील अदानी-एलबिट ॲडव्हान्स सिस्टम्स इंडिया लिमिटेड ही ड्रोन कंपनी आहे. या कंपनीने इस्त्राईलच्या सैन्याला 20 ड्रोन पाठवले आहे. ही कंपनी अदानी समूहाच्या मालकीची आहे. यामध्ये अर्थातच इस्त्राईलच्या एलबिट सिस्टिम्स या कंपनीची पार्टनरशिप आहे. अदानी समूह संरक्षण क्षेत्रातील उत्पादनात उतरली आहे. अदानी समूहाने त्यासाठी अदानी डिफेंस ही कंपनी सुरु केली आहे.
हर्मस 900 ड्रोन पाठवले
- इस्त्राईलने हमासविरोधात गाझा पट्टीत मोर्चा उघडलेला आहे. या युद्धात अदानी समूहाच्या कंपनीने हर्मिस 900 ड्रोन्स इस्त्राईलला पाठवले आहे. या ड्रोन्सला ‘दृष्टि 10’ या नावाने ओळखले जाते. या ड्रोन्सचा वापर देखरेखीशिवाय हवाई हल्ल्यासाठी करण्यात येतो.
- काही दिवसांपूर्वीच HT ने एक वृत्ती दिले होते. त्यानुसार अदानी समूह गाझामध्ये इस्त्राईलच्या सैन्याला ड्रोनचा पुरवठा करणार आहे. तर फेब्रुवारी महिन्यात ‘द वायर’ ने पण बातमी दिली होती. त्यानुसार अदानी एलबिट ॲडव्हान्स सिस्टम्स इंडिया लिमिटेड हर्मिस ड्रोन तयार करणार आहे. इस्त्राईलचे सैन्य त्याचा वापर करणार असल्याचे वृत्तात म्हटले होते.
- इस्त्राईलमध्ये अदानी समूहाने मोठी गुंतवणूक केली आहे. अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी पोर्ट्स अँड एसईझेड इस्त्राईलमध्ये हाईफा पोर्ट विकसीत करत आहे. इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहून यांच्या उपस्थितीत याविषयीचा करार झाला होता.
- हायफा बंदर हे आशिया आणि युरोप यांच्यामधील मोठे व्यापारी केंद्र आहे. तर जी20 मधील प्रस्तावात ‘भारत-पश्चिमी एशिया-यूरोप आर्थिक कॉरिडॉर’ चा तो एक प्रमुख भाग आहे. या बंदराच्या माध्यमातून भारतातून जाणारा माल युरोपमध्ये पोहचणार आहे.