भारतात अंडरविअर आणि बनियनचे मोठे मार्केट आहे. या क्षेत्रातील लोकल ब्रँडपासून तर अनेक जागतिक ब्रँड तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी गावाकडील आठवडी बाजारातही चांगल्या ब्रँड्सचे अंडरविअर आणि बनियन विक्रीला असते. भारत अंडरगारमेंटची मोठी बाजारपेठे आहे. त्यात अनेक लोकप्रिय ब्रँड आहेत. ते केवळ नावावरच कमाई करतात. आता या कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर 120 रुपयांचा बोनस देण्याचे जाहिर केले आहे. पण या कंपनीचा शेअर खरेदी करणे सोपे नाही. त्यासाठी महिन्याचा पगार पण कमी पडेल.
Page Industry ची कमाल
तर ही कंपनी आहे पेज इंडस्ट्रीज. ती भारतात ‘जॉकी’ ब्रँड नावाने अंडरगारमेंट तयार करण्याचे काम करते. जॉकी ब्रँडचे उत्पादन ही कंपनी मोठ्या प्रमाणात करते. कंपनीने नुकताच या आर्थिक वर्षातील 2023-24 मधील चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला. त्यानुसार कंपनी गुंतवणूकदारांना प्रति शेअर 120 रुपयांचा लाभांश (Dividend) देणार आहे.
जॉकी आणि पेज इंडस्ट्रीजचे कनेक्शन
किती आहे शेअरची किंमत
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये, जानेवारी-मार्चमधील चौथ्या तिमाहीत कंपनीला 108.2 कोटींचा नफा झाला. तर कंपनीला एकूण 3.2 टक्क्यांचा महसूल मिळाला. आता महसूल 995.3 कोटी रुपयांच्या घरात पोहचला. सध्या या कंपनीच्या एका शेअरची किंमत 35,650 रुपये आहे.
कधी मिळेल लाभांशाचा पैसा ?
पेज इंडस्ट्रीजने लाभांश देण्यासाठीची रेकॉर्ड डेट 31 मे निश्चित केली आहे. तर गुंतवणूकदारांच्या खात्यात लाभांशाची रक्कम 22 जून रोजी येईल. यापूर्वी पेज इंडस्ट्रीजने 2007 पासून ते आतापर्यंत गुंतवणूकदारांना 65 वेळा लाभांश दिला. फेब्रुवारी 2024 मध्ये पेज इंडस्ट्रीजने 100 रुपयांचा लाभांश दिला आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका