इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत होत असलेल्या चढउताराचा परिणाम भारतीय सराफ बाजारात होत असतो. भारतात सोन्याच्या दरात काल 222 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 43,580 रुपयांवरुन 43,358 रुपये प्रती तोळ्यावर आली. एकीकडे भारतात सोन्याचे हे दर असताना, तिकडे पाकिस्तानातील सोन्याचे (Pakistan Gold rate) भाव ऐकून धक्काच बसेल. पाकिस्तानात प्रतितोळा सोन्याचे भाव लाखाच्या घरात पोहोचला आहे. (Pakistan Gold rate)
पाकिस्तानातील उर्दू पॉईंट आणि बोलन्यूजने पाकिस्तानी सराफ बाजाराच्या आकडेवारीवरुन दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानात आजचे एका तोळ्याचे सोन्याचे भाव तब्बल 95 हजार 150 रुपये इतका आहे. 24 कॅरेट प्रतितोळा सोन्याचा हा आजचा भाव आहे. भारतात एक तोळा म्हणजे 10 ग्रॅम, मात्र पाकिस्तानात एक तोळा म्हणजे 11.34 ग्रॅम आहे.
पाकिस्तानी मीडियानुसार, 29 फेब्रुवारीचे 24 कॅरेट सोन्याचे प्रतितोळ्याचे भाव 95 हजार 150 रुपये तर 10 ग्रॅम सोन्याचे दर 81 हजार 576 रुपये इतके आहेत. पाकिस्तानातील हे दर वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे आहेत. कराची, इस्लामाबाद, लाहोर, रावळपिंडी, पेशावर, क्वेटा या महत्त्वाच्या शहरांमध्ये सोन्याच्या दरात थोडाफार फरक असू शकतो. मात्र हा फरक अगदीच नगण्य असतो.
भारतातील सोन्याचे भाव
दरम्यान, भारतातील आजचे सोन्याचे दर 41 हजाराच्या वर आहेत. बँक बाझार डॉट कॉमनुसार, मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर 43हजार 580 रुपये प्रतितोळा आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 41 हजार 500 इतका आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर
बुधवारी सोन्याचा भाव हा 43,502 रुपये प्रती दहा ग्रॅम होता. तर, मंगळवारी सोन्याचा भाव 43,564 रुपये प्रती दहा ग्रॅम होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,632 डॉलर प्रती औन्स आणि चांदी 17.25 डॉलर प्रती औन्स होता.
गुरुवारी सोन्या-चांदींच्या किंमतीत वाढ
गुरुवारी सोनं आणि चांदीच्या किंमती पुन्हा वाढल्या होत्या. गुरुवारी चांदीची किंमत 35 रुपयांनी वाढून 48,130 रुपयांवर पोहोचली.
टीप – सोन्या चांदीचे दर हे विविध शहरात वेगवेगळे असतात. बातमीतील तपशील विविध वेबसाईट्सवरील आकडेवारीनुसार आहे.
संबंधित बातम्या