अर्ज न करता फक्त आधारकार्डद्वारे मिळणार पॅनकार्ड

| Updated on: Feb 01, 2020 | 11:35 PM

आयकर विभागाकडून लवकरच एक नवी प्रणाली तयार करण्यात येणार (PAN card on aadhar card) आहे.

अर्ज न करता फक्त आधारकार्डद्वारे मिळणार पॅनकार्ड
1. पॅन आणि आधार लिंक : पॅन आणि आधार क्रमांक लिंक करण्यासाठी येणारा महिना खूप खास असणार आहे. भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी या कामाची अंतिम तारीख 30 सप्टेंबर निश्चित केली. प्रत्येक ग्राहकाला या संपूर्ण महिन्यात कोणत्याही वेळी आधार आणि पॅन लिंक करावे लागेल आणि हे काम 30 सप्टेंबरपर्यंत करावे लागेल. हे काम जितक्या लवकर पूर्ण कराल तितके चांगले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही. जर पॅन आणि आधार जोडलेले नाहीत, तर बँकांकडून मिळणाऱ्या सर्व सुविधा बंद होतील.
Follow us on

नवी दिल्ली : आयकर विभागाकडून लवकरच एक नवी प्रणाली तयार करण्यात येणार (PAN card on aadhar card) आहे. ज्यामुळे करदात्यांना कोणताही अर्ज न भरता नवीन PAN (परमनेंट अकाऊंट नंबर) कार्ड मिळणार आहे. ही सुविधा फक्त आधार कार्ड असलेल्यांसाठी उपलब्ध असणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी (1 फेब्रुवारी) मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी निर्मला सीतारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता करदात्यांची आधार कार्डद्वारे पडताळणी सुरु केली जाणार आहे. तसेच करदात्यांच्या सोयीसाठी आणि सुविधेसाठी कोणताही अर्ज न करता फक्त आधारच्या अंतर्गत पॅनकार्डच्या वाटपासाठी लवकरच नवी ऑनलाईन प्रणाली सुरु केली जाईल.

पॅन कार्डसाठीची प्रक्रिया सोपी करण्यासाठी आम्ही लवकरच एक नवी प्रणाली सुरु करत आहोत. याद्वारे कोणताही तपशीलानुसार अर्ज न करता केवळ आधार कार्डद्वारे ताबडतोब पॅनकार्ड दिले जाईल अशी माहिती अर्थमंत्री सीतारमण यांनी दिली.

दरम्यान 31 मार्च 2020 च्या आधी पॅनकार्डला आधार कार्डसोबत लिंक करणे अनिवार्य करण्यात आले होते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या NSDL आणि UTI-ITSL या दोन एजन्सी पॅन कार्ड उपलब्ध करुन देतात. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासह, बँक अकाऊंट खोलण्यासाठी पॅनकार्डची आवश्यकता (PAN card on aadhar card) असते.