नवी दिल्ली : पतंजली आयुर्वेद, हे नाव ऐकताच योग गुरु बाबा रामदेव यांचा चेहरा सर्वात अगोदर समोर येतो. बाबा रामदेव पतंजलीचा चेहरा असले तरी त्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने आचार्य बालकृष्ण यांच्या खाद्यांवर आहे.एक रुपया वेतन न घेणारे आचार्य बालकृष्ण (Acharya Balakrishna) यांच्याकडे इतके संपत्ती आहे. फोर्ब्सच्या श्री्मंतांच्या यादीत (Forbes Billionaires Index) त्यांचे नाव आहे. या यादीत त्यांचा क्रमांक मागे असला तरी त्यांची संपत्ती डोके चक्रावणारे आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार, 15 जून, 2023 रोजी त्यांची एकूण संपत्ती जवळपास 3.6 अब्ज डॉलर म्हणजे 29,587 कोटी रुपये आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत त्यांचा 810 वा क्रमांक आहे.
20 वर्षांपूर्वी नव्हता विश्वास
20 वर्षांपूर्वी कोणी सांगितले असते की, योग आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून अब्जाधीश होता येते, तर कदाचित त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवला नसता. कारण ही गोष्ट पटण्यासारखीच नव्हती. पण आज पतंजली आयुर्वेदचे चेअरमन आचार्य बालकृष्ण यांची संपत्ती पाहता काहीच अशक्य नसल्याचे म्हणणे पटते.
काय आहे आचार्य बालकृष्ण यांची कहाणी
1972 मध्ये आचार्य बालकृष्ण यांचा जन्म झाला. हरियाणा येथील खानपूर गुरुकूलमध्ये ते शिक्षण घेत असताना बाबा रामदेव यांच्याशी त्यांची पहिली भेट झाली. 1995 मध्ये रामदेव, आचार्य बालकृष्ण आणि आचार्य करमवीर यांनी दिव्य योग मंदिर ट्रस्ट सुरु केले. ही सेवभावी संस्था हरिद्वारमधील कृपालू बाग आश्रमात सुरु झाला होता. या ट्रस्टने योग शिक्षा देण्यास सुरुवात केली. रामदेव बाबा यांची ओळख योगगुरु म्हणून सर्वांना झाली. दुरदुरुन लोक त्यांच्याकडे योग शिकण्यास येऊ लागले. त्यानंतर टीव्हीच्या माध्यमातून त्यांचा योग भारतभरच नाही तर परदेशात पोहचला. त्यामाध्यमातून अनेकांच्या आरोग्याच्या किरकोळ तक्रारी दूर झाल्या.
पतंजलीत काहीच वाटा नाही
पतंजली ट्रस्टमध्ये रामदेव बाबा यांची कोणतीच हिस्सेदारी नाही. तर आचार्य बालकृष्ण यांच्याकडे कंपनीचे 94 टक्के शेअर्स आहेत. बालकृष्ण या ट्रस्टसाठी 15 तास काम करतात. पण पगारापोटी एक पैसा ही घेत नाही. आचार्य बालकृष्ण यांच्या मते या पैशांचा वापर लोकांच्या भल्यासाठी होणे आवश्यक आहे. लोकांच्या कल्याणासाठी पैशांचा वापर करावा, असा नियम आचार्यांनी ठरविला आहे. त्यामुळे ते एक रुपया पण पगार घेत नाहीत.
किती आहे पतंजलीची उलाढाल
पतंजलीचा वार्षिक टर्नओव्हर 40 हजार कोटी रुपयांच्या जवळपास आहे. रामदेव बाबांनी सप्टेंबर 2022 मध्ये एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती. पुढील पाच वर्षांत हे उद्दिष्ट दुप्पट करण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले होते. आचार्य बालकृष्ण पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आणि पतंजली योगपीठ हरिद्वारचे सह संस्थापक आहेत. सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) नियम, 1957 च्या नियम 19A (5) अंतर्गत, सूचीबद्ध युनिटने किमान 25 टक्के सार्वजनिक शेअरहोल्डिंग धारण करणे आवश्यक आहे.परंतु, मार्च 2022 मध्ये FPO आल्यानंतर, किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग 19.18 टक्क्यांपर्यंत वाढले. नियमानुसार 25 टक्क्यांपेक्षा हे 5.82 टक्के कमी आहे.