नवी दिल्ली | 4 February 2024 : पेटीएम पेमेंट्स बँक सध्या चर्चेत आहे. बँकेची विविध कारनामे समोर आल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने तिच्यावर बंदी आणली. कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईचा ग्राहकांवर मोठा परिणाम होणार नाही. अनेकांना बँकेवर ही कारवाई कशामुळे करण्यात आली, याविषयी अजूनही संभ्रम आहे. पेटीएम बँक सातत्याने आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांचे आणि निर्देशांचे उल्लंघन करत असल्याचे समोर आले होते. पण पेटीएमचे कारनामे यावरुनही मोठे होते.
मनी लाँड्रिंगची शंका
बँकेवर सर्वात मोठा ठपका मनी लाँड्रिंगचा करण्यात येत आहे. तर केवायसी न करता अनेक बँक खाती सुरु करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यात 1,000 हून अधिक बँक खाती केवळ एकाच पॅन कार्ड आधारे उघडण्यात आल्याचे निष्पन्न झाले. आरबीआय आणि लेखापालांनी बँकेचा अनुपालन अहवाल तपासल्यावर त्यात अनेक कारनामे समोर आले. त्यात आरबीआयला मनी लाँड्रिंगची शंका येत आहे.
पीएमओपर्यंत पोहचली कागदपत्रे
आरबीआयने त्यांच्या तपासाात समोर आलेली माहिती, ईडी, गृह मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाला पाठवली आहे. महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी जागतिक वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, या आरोपात तथ्य आढळल्यास अंमलबजावणी संचालनालय, ईडी पेटीएम पेमेंट्स बँकेची चौकशी करेल.
समूहातंर्गत अनेक शंकास्पद व्यवहार
पेटीएम समूहातंर्गत अनेक व्यवहार झाले आहेत. ते सध्या रडारवर आहेत. कारण या व्यवहारांमध्ये पारदर्शकता नाही. केंद्रीय बँकेने, या व्यवहारांमध्ये अनेक अनियमतता असल्याचे म्हटले आहे. पेटीएम पेमेंट्स बँक आणि मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशन्स यांच्यात अनेक त्रुटी असताना व्यवहार झाल्याचे तपासात समोर येत आहे. तसेच पेटीएमच्या माध्यमातून करण्यात आलेल्या व्यवहाराचा डाटा सुरक्षीत नसल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे आरबीआयने पेटीएमवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आरबीआयच्या कारवाईनंतर शुक्रवारी पेटीएमच्या शेअरमध्ये मोठी पडझड दिसून आली. दोन दिवसांत पेटीएमच्या शेअरमध्ये 36% घसण दिसली. या कंपनीचे बाजारातील मूल्य 2 अब्ज डॉलरने घसरले.
पेटीएमवर ही बंदी