मोठ्या अडचणींचा सामना केल्यानंतर पेटीएम आता पुन्हा मैदानात उतरली आहे. पेटीएमची मुळ मालक One97 Communication ने भविष्यातील विस्तार योजनेची सविस्तर माहिती दिली. कंपनीने महसुलात मोठा पल्ला गाठला. कंपनीवरील अनेक निर्बंध हटल्यानंतर कंपनी बंद केलेल्या सेवा पुन्हा सुरु करणार आहे. त्यामुळे बाजारात इतर स्पर्धकांना आता तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे.
आम्हाला मिळाली मोठी संधी
“आमच्या व्यवसायावरील मळभ त्यामुळे हटले आणि नवीन संधी आम्हाला मिळाली. ग्राहक आणि व्यावसायिक उलाढालीला त्यामुळे मजबुती आली. इतक्या कमी वेळेत हे घडले याचा खूप मोठा आनंद आहे. एनपीसीआय, सहयोगी बँक आणि आमची सहकारी टीम यांच्यामुळे हे साध्य झाले. सरकार, नियंत्रक संस्था आणि वित्तीय सेवांचा समावेश यांच्यामुळे दीर्घकालीन वाढीची आम्हाला मोठी संधी प्राप्त झाली.” असे पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी शेअरधारकांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
“गेल्या तिमाहीत आम्हाला काही उत्पादनं आणि सेवा बंद कराव्या लागल्या होत्या. पण आता मला हे सांगण्यास आनंद होत आहे की, या सेवा, उत्पादनं लवकरच पुन्हा ग्राहकांच्या दिमतीला असतील.” असे त्यांनी म्हटले आहे.
या फेब्रुवारीत पेटीएमला त्यांची व्यावसायिक काही उत्पादनं आणि सेवा बंद कराव्या लागल्या होत्या. तर युपीआय पेमेंटसाठी इतर काही बँकांशी सहकार्य करार करावा लागला होता. मार्च महिन्यात व्यवसायाने चांगली प्रगती केली होती. कंपनीने आर्थिक वर्ष 2024 मधील वार्षिक अहवालात म्हटले आहे की, आम्ही आगेकूच करत आहोत. आम्ही व्यापक कर्ज वितरण मॉडेलवर काम करत आहोत. त्यामाध्यमातून वसुली पण होईल.
अशी केली घौडदौड