भारतीय युपीआयसह सेवा बाजारातील जु्ना खेळाडू पेटीएमने चमकदार कामगिरी दाखवली. कंपनीने महसूलात मोठी घौडदौड केली. या फिनटेक कंपनीने आता विमा क्षेत्रासह इतर विभागावर लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जोरदार कामगिरी बजावली. कंपनीच्या महसूलात 25 टक्क्यांची घसघशीत वाढ झाली. कंपनीचा महसूल आता 9,978 कोटी रुपयांवर पोहचला आहे. कंपनीची संपूर्ण वर्षाचा EBITDA पहिल्यांदाचा 559 कोटींच्या घरात पोहचला आहे. आयपीओ बाजारात दाखल झाल्यापासूनचा हा आलेख आहे.
आता या क्षेत्रावर फोकस
आर्थिक वर्षाचा मांडला ठोकताळा
One97 Communication limited चा पेटीएम हा ब्रँड आहे. भारताच्या आर्थिक क्षेत्रातील ही मोठी कंपनी आहे. ही QR कोड, साऊंडबॉक्स आणि मोबाईल पेमेंटमधील सर्वात आघाडीची कंपनी आहे. कंपनीने नुकताच आर्थिक वर्ष 2024 मधील चौथ्या तिमाहीतील निकाल घोषीत केला आहे.
या आर्थिक वर्षात (FY24) कंपनीने या क्षेत्रात कमाल कामगिरी करुन दाखवली. कंपनीने भरीव वाढ दर्शविली. कंपनीने कोट्यवधी पेमेंट आणि वित्तीय सेवांमध्ये भरीव कामगिरी बजावली. कंपनीच्या महसूलात 25 टक्के वाढ झाली आहे. वार्षिक आधारावर या वाढीमुळे महसूलाचा आकडा आता 9,978 कोटींच्या घरात पोहचला आहे.
जीएमव्ही वाढ, इतर सेवांमधील दमदार कामगिरी यामुळे कंपनीने मोठे लक्ष गाठले. महसूलात आघाडी घेतली. कंपनीची संपूर्ण वर्षाचा EBITDA पहिल्यांदाचा 559 कोटींच्या घरात पोहचला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात तो 734 कोटींच्या घरात होता. आयपीओ बाजारात दाखल झाल्यापासूनची ही घौडदौड आहे. तर युपीआय इन्सेंटिव्हमध्ये 288 कोटींची भर पडली आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात हा आकडा 182 कोटी रुपये होता. या घौडदौडीमुळे महसूलातील तोटा पण कमी झाला आहे.
कंपनीचे नफ्यातील योगदानात मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये 42 टक्के नफा झाला, हा आकडा 5,538 कोटी रुपयांवर पोहचला. वित्तीय सेवांच्या माध्यमांतून हा आकडा गाठता आला. कंपनीचा पेमेंट सेवेचा महसूल 26 टक्क्यांनी वाढला. तो वार्षिक आधारावर या आर्थिक वर्षात 6,235 कोटींच्या घरात पोहचला. तर या चौथ्या तिमाहीत त्यात 7 टक्के वार्षिक आधारावर वाढ होऊन हा आकडा 1,568 कोटींच्या घरात पोहचला. तर कर्ज वितरण मूल्य 48 टक्क्यांच्या घरात पोहचले. या आर्थिक वर्षात कर्ज वितरणाचा आकडा 52,390 कोटींच्या घरात पोहचले आहे.
कंपनीचे एकूण व्यापारी मूल्य (Gross merchandise Value) 39 टक्क्यांनी वाढले आहे. या आर्थिक वर्षात हा आकडा 18.3 लाख कोटींच्या घरात पोहचला. पेमेंट सेवेच्या माध्यमातून कमाईवर लक्ष केंद्रीत केल्याचे हे फळ म्हणता येईल. तर सब्सक्रिप्शन महसूलात मोठी वाढ झाली आहे. 1.07 कोटी व्यापाऱ्यांच्या देवाण-घेवाणीतून मार्च 2024 मध्ये ही वाढ नोंदवली. ही वाढ 58 टक्के इतकी नोंदवली गेली. मार्च 2023 मध्ये वार्षिक आधारावर 68 लाख असा आकडा होता.
कमी वेळात जोरदार आघाडी
“मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, आम्ही इतर सहयोगी बँक आणि सहकाऱ्यांच्या मदतीने आमचा एकत्रित पेमेंट व्यवसायात भरारी घेतली. आमच्या व्यवसायावरील मळभ त्यामुळे हटले आणि नवीन संधी आम्हाला मिळाली. ग्राहक आणि व्यावसायिक उलाढालीला त्यामुळे मजबुती आली. इतक्या कमी वेळेत हे घडले याचा खूप मोठा आनंद आहे. तर यावेळी बाजार नियंत्रकांनी सुद्धा आम्हाला मोलाची साथ दिली. एनपीसीआय, सहयोगी बँक आणि आमची सहकारी टीम यांच्यामुळे हे साध्य झाले. सरकार, नियंत्रक संस्था आणि वित्तीय सेवांचा समावेश यांच्यामुळे दीर्घकालीन वाढीची आम्हाला मोठी संधी प्राप्त झाली.” असे पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी शेअरधारकांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
काय आहेत ठळक मुद्दे
क्रेडिट वितरणावर दिला भर
या आर्थिक वर्षात पेटीएमने केवळ क्रेडिट वितरणावर अधिक भर दिला. वितरणातही त्यांचे लक्ष क्रेडिट वितरण मॉडेलवर होते. बँका, वित्तीय संस्था आणि तंत्रज्ञानाची मदत यांच्या सहाय्याने कंपनीने मोठी भरारी घेतली. त्याआधारे कंपनीने कर्ज वितरणावर लक्ष केंद्रीत केले.
विमा आणि वित्तीय सेवा-उत्पादनांवर लक्ष
कंपनीने आता आर्थिक वर्ष 2025 साठी त्यांचे लक्ष्य निर्धारीत केले आहे. त्यानुसार कंपनी विमा, वित्तीय सेवा आणि उत्पादनांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. उभारत्या विमा क्षेत्रातील संधी पाहता कंपनीने एक आरोग्य विमा उत्पादन बाजारात उतरविण्यावर भर दिला आहे. हा आरोग्य विमा कॅशलेश उपचार देईल. त्यात मासिक हप्त्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच त्रासविरहित आणि सहज दावा करण्याची सुविधा यामध्ये असेल. कंपनी ऑटो, शॉप, आरोग्य आणि जीवन विमा क्षेत्रात पाय रोवणार आहे.
AI तंत्रज्ञानाचा करणार वापर
Paytm ने एआयच्या वापरावर भर दिला आहे. संघटनात्मक कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि कार्यशैली सुधारणेसाठी त्याचा वापर करण्यात येईल, त्याजोगे वार्षिक 400-500 कोटी रुपयांच्या बचतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. युझरचा या प्लॅटफॉर्मवरील वावर पण वाढला आहे. या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत सरासरी मासिक उलाढालीत 7 टक्क्यांची वाढ झाली असून वार्षिक आधारावर हा आकडा 9.6 कोटींच्या घरात पोहचला आहे.
कंपनीच्या मेट्रिक्समध्ये तात्पुरता व्यत्यय दिसत असला तरी आर्थिक वर्ष 2025 मधील पहिल्या तिमाहीत ग्राहक आणि व्यापारी यांचा आधार असलेल्या मेट्रिक प्रणालीत स्थिरता दिसून येईल असा कंपनीचा दावा आहे. कंपनी डिजिटल पेमेंट उत्पादनाव्यतिरिक्त इतर सेवांमध्ये आगेकूच करत आहे, हे एप्रिल महिन्यातील दरवाढीच्या कलावरुन स्पष्ट होते आहे.
पेटीएम आता TDAP