समस्त भारतीयांसाठी सोने हे महत्वाचे आहे. केवळ नटण्यासाठीच नाही तर भविष्य सांभाळण्यासाठी देखील सोने हा पर्याय उपयुक्त आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करणे ही भारतीयांची पारपारिक पद्धत आहे. या गुंतवणुकीत गेल्या एका वर्षभरात वाढ दिसून आली आहे. मनी 9 च्या पर्सनल फायनान्स सर्व्हेमध्ये 2022 मध्ये 15 % कुटुंबांनी सोन्यामध्ये बचत केली तर हेच प्रमाण 2023 मध्ये 23 % वर पोहोचला आहे. सोन्याच्या किंमतीत सतत होणाऱ्या वाढीमुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे सॉव्हरेन गोल्ड बॉंड सारखे गुंतवणुकीचे अधिक आणि सुरक्षित परतावा देणारे पर्याय वाढल्याने देखील या गुंतवणुकीमध्ये वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी सोने खरेदीमध्ये पश्चिम भारताचे वर्चस्व दिसून आले आहे. 2022 च्या सर्वेक्षणात 51 % कुटुंबं ही सूरतमधील असून हे शहर आघाडीवर राहिले. पण या वर्षीच्या सर्वेक्षणात 69 % कुटुंबांसह बेंगळुरू आघाडीवर असून तिरूवअनंतपुरम चा दूसरा क्रमांक आहे. या राज्यात 66 % कुटुंबं सोन्याची बचत करत असल्याचे समोर आले आहे. यानंतर सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये दार्जिलिंगचा क्रमांक येतो.
पूर्व आणि दक्षिण भारत आघाडीवर :
सोने गुंतवणुकीमध्ये पूर्व आणि दक्षिण भारताचे वर्चस्व अधिक असल्याचे दिसून आले आहे. जलपाईगुडी हे चौथे शहर असून या शहरातील 57 % कुटुंबांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. यानंतर शिवमोग्गा आणि पश्चिम मेदिनीपुरचा क्रमांक येतो. सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या टॉप 10 शहरांमध्ये उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ, राजकोट , कोईम्बतूर आणि फरीदाबाद या शहरांचा समावेश आहे.
हे सर्वेक्षण RTI इंटरनॅशनल या नामांकित जागतिक संस्थेने केले असून ही संस्था वर्ल्ड बँकसारख्या मोठ्या संस्थांचेदेखील सर्वेक्षण करते.