Petrol Diesel Rate Today : देशात गेल्यावर्षी मे महिन्याच्या अखेरीस केंद्र आणि त्यानंतर राज्य सरकारने केलेली उत्पादन शुल्क आणि मूल्यवर्धित करातील कपात दिलासा देणारी ठरली. पण स्वस्त पेट्रोल-डिझेलचे स्वप्न अजून काही प्रत्यक्षात उतरले नाही.
Ad
दर कपात केव्हा
Follow us on
नवी दिल्ली : स्वस्त पेट्रोल-डिझेलचे स्वप्न केंद्र सरकारने अजूनही पूर्ण केले नाही. देशात गेल्यावर्षी मे महिन्याच्या अखेरीस केंद्र आणि त्यानंतर राज्य सरकारने केलेली उत्पादन शुल्क आणि मूल्यवर्धित करातील कपात दिलासा देणारी ठरली. पण स्वस्त पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price) स्वप्न अजून काही प्रत्यक्षात उतरले नाही. जागतिक बाजारात कच्चा तेलाने (Crude Oil) आज दुडूदुडू चालीला ब्रेक लावला. काल अचानक भावाने उसळी घेतली होती. आज 2-3 डॉलर प्रति बॅरलने भाव घसरले आहेत. राज्यात पुणे शहरात पेट्रोल-डिझेल सर्वात स्वस्त आहे. मग तुमच्या शहरात एक लिटरसाठी खिशाला किती रुपयांची झळ बसेल.
क्रूड ऑईलचा आजचा भाव
आज 26 मे रोजी, कच्चा तेलाने दरवाढीला ब्रेक दिला. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) आता 71.90 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा (Brent Crude Oil) भाव 76.17 डॉलर प्रति बॅरल झाला.
मोठा बदल नाही
केंद्र सरकारने 22 मे रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) कपात केली. त्यानंतर देशातील भाजपशासित राज्यांनी तोच कित्ता गिरवला. त्यांनी मूल्यवर्धीत करात कपात केली. त्यामुळे जनतेला एका लिटरमागे 10 ते 12 रुपयांचा फायदा झाला. पण गेल्या एक वर्षात इंधनाच्या भावात कोणताही मोठा बदल झालेला नाही.
. प्रति लिटर इतका फायदा
देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या वर्षभरापासून मोठा फरक दिसलेला नाही. बाजारात तेलाच्या किंमतीत मामूली बदल दिसतो. जवळपास 345 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत दिसलेली नाही. एका अहवालानुसार, तेल कंपन्यांना प्रति लिटर 10 रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे.