नवी दिल्ली : आज सलग बाराव्या दिवशी देशात पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol diesel price) स्थिर आहेत. इंधनाच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज कच्च्या तेलाच्या दरात तेजी दिसून येत आहे. कच्च्या तेलाचे (crude oil) दर 9 टक्क्यांनी वाढले असून, ते 111.23 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे शनिवारी जेट फ्यूलचे (Jet fuel) दर देखील वाढवण्यात आले आहेत. मात्र देशात आजही पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोललियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेल 96.97 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 120.51 रुपये तर डिझेल 104.77 लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल, डिझेलचे भाव अनुक्रमे 115.12 आणि 99.83 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये लिटर आहे.
आज सलग बाराव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. सर्वसामान्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये आहे. परभणीत पेट्रोलचे दर प्रति लिटर 123.53 रुपये आहे. तर डिझेलचा भाव 106.10 रुपये प्रति लिटर इतका आहे. मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेल 104.77 लिटर आहे. पुण्यात पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.30 रुपये असून, डिझेल 104. 30 रुपयांवर पोहोचले आहे. नागपूरमध्ये पेट्रोलचे भाव प्रति लिटर 120.15 तर डिझेल 102.89 रुपये लिटर आहे. रंगाबादमध्ये पेट्रोल 120.15 तर डिझेल 104.40 रुपये लिटर आहे.
गेल्या महिन्याभरात पेट्रोल, डिझेलचे दर प्रति लिटर दहा रुपयांपेक्षा देखील अधिक वाढले आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणात यावेत अशी मागणी आता जनतेकडून होऊ लागली आहे. दरम्यान याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री पुरी यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले केंद्राने याआधीच पेट्रोल, डिझेलवर एक्साईज ड्यूटीमध्ये कपात केली आहे. आता केंद्राकडून कोणतीही कपात होणार नाही, त्याऐवजी राज्य सरकारने जर आपआपल्या राज्यातील पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी केल्यास इंधन स्वस्त होऊ शकते.
तापमानाचा पारा चढला; AC ची मागणी वाढली, विक्रीत रेकॉर्ड ब्रेक वाढ