राज्यासह देशात इंधनाच्या (fuel) किमतीत दरवाढ सुरूच आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल (Petrol) डिझेलचे (diesel) दर वाढवण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 80 पैशांनी महाग झाले आहे, तर मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रति लिटरमागे 85 पैशांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार आज दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेल प्रति लिटर 96.67 रुपयांवर पोहोचले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये आज पेट्रोलचा भाव 120.51 रुपये लिटर आहे. तर डिझेलने देखील शंभरी पार केली असून, डिझेल 104.77 रुपयांवर पोहोचले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचे रेट 110.11 रुपये तर डिझेलसाठी 100.19 रुपये मोजावे लागत आहेत. कोलकातामध्ये पेट्रोल 114.28 रुपये लिटरवर पोहोचले आहे. अनेक दिवस पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर होत्या. मात्र गेल्या 22 मार्चपासून पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये दरवाढ सुरू झाली आहे. तेव्हापासून आजपर्यंत इंधनाच्या किमती प्रति लिटर मागे तब्बल 9 रुपयांपेक्षा अधिक महाग झाल्या आहेत.
राज्यात आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रति लिटर मागे 85 पैशांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोचा दर प्रति लिटर 120.51 तर डिझेल प्रति लिटर 104.77 रुपयांवर पोहेचले आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 119.33 तर डिझेल 102.65 रुपयांवर पोहोचले आहे. नाशिकमध्ये पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 119.11 व 101.83 रुपये मोजावे लागत आहेत. दुसरीकडे औरंगाबादमध्ये देखील पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. औरंगाबादमध्ये पेट्रोल 119.97 रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेलच्या दरामध्ये वाढ होऊल डिझेल प्रति लिटर 102.65 रुपयांवर पोहोचले आहे. पुण्यात पेट्रोलचे दर प्रति लिटर 119.07 रुपये एवढा झाला आहे तर डिझेलचे दर प्रति लिटर 102.67 रुपयांवर पोहोचले आहेत.
इंधनाच्या किमती वाढतच आहेत, गेल्या पंधरा दिवसांमध्ये इंधनाच्या किमतीत प्रति लिटरमागे 9 रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. याबाबत संसदेत बोलताना पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले की, केवळ भारतातच नाही तर जगभरात इंधनाच्या किमती वाढत आहेत. त्यामानाने भारतात कमी भाववाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात अमेरिकेत पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये 55 टक्क्यांची वाढ झाली आहे. जर्मनीमध्ये 54 टक्के व कॅनडामध्ये इंधनाच्या किमतीमध्ये 51 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्या मानाने भारतात आतापर्यंत केवळ पाच टक्के इतकीच वाढ करण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Price of petrol & diesel in Delhi at Rs 105.41 per litre & Rs 96.67 per litre respectively today (increased by 80 paise)
In Mumbai, the petrol & diesel prices per litre at Rs 120.51 (increased by 84 paise) & Rs 104.77 (increased by 85 paise) pic.twitter.com/Mohc7gxASJ
— ANI (@ANI) April 6, 2022
घरांच्या किमती वाढल्या; जाणून घ्या का वाढतायेत घरांचे दर?
15 दिवसांत 13 वेळा वाढ, प्रत्येकवेळी 80 पैशांची भर टाकण्यामागचं नेमकं कारण काय? उत्तर मिळालंय!
घर घ्यायचे आहे आता चिंता सोडा; ‘या’ बँका देत आहेत सात टक्क्यांपेक्षाही कमी दराने Home loan