मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर (Petrol Diesel price) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दारमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून दर स्थिर आहेत. आज सलग 26 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोल, डिझेलच्या भावात शेवटची वाढ सहा एप्रिल रोजी करण्यात आली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत पेट्रोलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. 4 नोव्हेंबर 2021 ला केंद्र सरकारने इंधनावरील करात कपात केल्याने पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर सलग चार महिने इंधनाचे दर स्थिर होते. 22 मार्च 2022 रोजी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली. 22 मार्च ते 6 एप्रिल या काळात पेट्रोल (Petrol), डिझेलच्या दरात लिटर मागे तब्बल दहा रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली. आता पुन्हा एकदा दर स्थिर असल्याचे दिसून येत आहे. इंधन कंपन्यांनी जाहिर केलेल्या आजच्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये (Petrol Price in Delhi Today) पेट्रोल प्रति लिटर 105.41 रुपये लिटर तर डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर आहे.