पेट्रोलियम कंपन्यांकडून आज इंधनाचे नवे दर (Petrol-Diesel price) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नसून, पेट्रोल (Petrol), डिझेलचे दर स्थिर आहेत. आज सलग सातव्या दिवशी इंधनाच्या (Fuel) दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 22 मार्चपासून इंधन दरवाढीला सुरुवात झाली होती. शेवटची दरवाढ ही सहा एप्रिल रोजी करण्यात आली होती. 22 मार्च ते 6 एप्रिल या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल दहा रुपयांपेक्षा अधिक वाढ करण्यात आली. मात्र गेल्या सात दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 105.41 रुपये, मुंबईमध्ये 120.51 रुपये, कोलकातामध्ये 115.12 रुपये, तर चेन्नईमध्ये 110.85 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचे दर दिल्लीमध्ये 96.67 रुपये, मुंबईमध्ये 104.77 रुपये, कोलकातामध्ये 99.83 रुपये आणि चेन्नईमध्ये 100.94 रुपये प्रति लिटर आहे.
आज राज्यात देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी जारी केलेल्या आजच्या दरानुसार मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 120.51 रुपये आहेत तर डिझेलचा भाव प्रति लिटर 104.77 रुपये एवढा आहे. पुण्यात प्रति लिटर पेट्रोल, डिझेलसाठी 120. 30 आणि 103. 10 रुपये मोजावे लागत आहेत. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 120.11 रुपये लिटर तर डिझेल 102.82 रुपये लिटर आहे. तर नागपूरमध्ये डिझेल प्रति लिटर 102.89 रुपये आणि पेट्रोल 120.15 रुपये लिटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल 121.76 रुपये लिटर आहे.
एकीकडे आज राज्यात सलग सातव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. पुण्यात सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शहरात आता सीएनजी 68 रुपयांवरून 73 रुपयांवर पोहोचला आहे. याचा मोठा फटका हा आता पुणेकरांना बसण्याची शक्यता आहे. ही दरवाढ आजपासून लागू करण्यात आली आहे.
CNG rates hike : महागाईचा भडका, पुण्यात सीएनजीच्या दरात पाच रुपयांची वाढ
‘आरबीआय’ नियंत्रित बाजाराची वेळ बदलली ; सोमवार पासून सकाळी ‘नऊ’ ला सुरू होईल कामकाज