पुण्यात राहणाऱ्या अजयला दररोज महागाईचा (Inflation) सामना करावा लागतोय. मुलाला शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा (School bus) प्रवासही महागलाय. दोन वर्षानंतर शाळा उघडताच स्कूल व्हॅनच्या किरायात (Rent) दीडपट वाढ झालीये. 1500 रुपयांवरून थेट 2,300 रु. महिना कारण अजयलाही माहिती आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी, विमा, टोल, टायर सगळचं महाग झालंय. इंधनाच्या किंमती तर गगनाला भिडल्या आहेत. मुलाला शाळेत सोडण्याचा आणि अजयला ऑफिसला जाण्याचा खर्च वाढलाय.फक्त अजयच नाही तर आपण सगळेच जण वाढत्या महागाईचा सामना करत आहोत. महागाईची झळ कुणाला जास्त लागत आहे तर कुणाला कमी एवढाच काय तो फरक. कमी जास्त यासाठी पेट्रोल, डिझेलचा उपयोग तुम्ही थेट करत नसाल. मात्र, किराणा सामान आणि भाजीपाल्याची खरेदी करत असालच. तुमचं स्वत:च वाहन नसेल पण तुम्ही ऑटो, टॅक्सी, ओला, उबेरचा वापर करताच ना? महागाई सगळीकडेच वाढलीये. उबेरनं भाड्यात 15 टक्के वाढ केलीये.
कारखान्यातून माल, शेतातून भाजीपाला आणि फळं ट्रकमधूनच बाजारात येतात. 70 टक्के डिझेलचा वापर वाहतुकीसाठी होतो. डिझेल वाढल्यानंतर वाहतूक महाग झालीये. महिनाभरात वाहतूक भाड्यात 5 टक्के वाढ झालीये. किंमती सतत वाढतच आहेत. सलग 16 दिवसांपासून इंधनाच्या दरात 14 वेळेस वाढ झालीये. मुंबईत पेट्रोलची किंमत 120.51 रुपये तर डिझेलचे भाव 104.77 रुपये आहेत. तर नागपूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.47 रुपये आहे. डिझेल प्रति लिटर 103.19 रुपये आहे. पेट्रोल-डिझेलनं देशातील प्रत्येक शहरात शंभरी गाठलीये. पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीमध्ये करा, अशी वाहतूकदारांची मागणी आहे. पेट्रोल,डिझेल, सीएनजीमधील महागाईच्या भडक्याची धग दिवसेंदिवस वाढतच असल्यानं जगण्याचाही खर्चही वाढलाय.
सगळ्याच गोष्टी महाग होत आहेत. सीएनजीच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे. सीएनजीचे दर वाढल्याने टॅक्सीच्या भाड्यात वाढ करावी अशी मागणी आता मुंबईतील टॅक्सी चालकांनी केली आहे. शेवटची भाडेवाढ झाली होती, तेव्हापासून ते आतापर्यंत सीएनजीच्या दरात तब्बल 35 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र अद्याप एकदाही टॅक्सीचे भाडे वाढवण्यात आले नाही. त्यामुळे आता टॅक्सीच्या भाड्यात वीस ते पंचवीस रुपयांची वाढ करावी अशी मागणी टॅक्सीचालकांनी केली आहे. टॅक्सीचे भाडे वाढल्यास शहरात फिरने देखील महागणार आहे.
सीएनजी महागला आता टॅक्सीचे भाडे वाढवा; मुंबई टॅक्सी मेन्स युनियनची मागणी
म्युच्युअल फंडची कोटीची उड्डाण, एसआयपीकडे वाढता कल; हजारो कोटींची उलाढाल