नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Rate Today) जाहीर केलेत. गेले काही दिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही भाववाढ झालेली नाही. दरम्यान, सलग तीस दिवस आता पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं. गुरुवारीदेखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या 30 दिवसात तेल कंपन्यांनी कोणतीही भाववाढ पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केलेली नसल्यानं हा एक दिलासा मानला जातो आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमती प्रचंड वाढलेल्या होत्या. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज दरवाढ नोंदवली जात होती. मात्र आता कच्च्या तेलाच्या किंमती वाढलेल्या नसल्यामुळे इंधनाचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळतंय. ब्रेंट क्रूडचे दर हे आता वाढून 108.9 डॉलर प्रति बॅरल झाले आहेत. तर WTI क्रूज 3.79 टक्क्यांनी वाढून 1.06.3 डॉल प्रति बॅरल वाढलेत. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) आता पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ नोंदवण्यात आलीय.
22 मार्च ते सहा एप्रिलपर्यंत देशात पेट्रोल, डिझेलचे दर प्रति लिटर मागे दहा रुपयांपेक्षा देखील अधिक वाढले. मात्र गेले सलग 30 दिवस इंधनाचे दर स्थिर आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये असून, डिझेलचा दर 96.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेलचा दर 104.77 रुपये लिटर आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 110.85 व 100.94 रुपये लिटर आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 115.12 रुपये असून, एका लिटर डिझेलसाठी 99.83 रुपये मोजावे लागत आहेत.