नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्चा तेलाचे (Crude Oil) दर सपाटून पडले आहेत. कच्चा तेलाचे भाव 80 डॉलरच्या ही खाली पोहचले आहे. त्यामुळे देशातील वाहनधारकांमध्ये आता तरी केंद्र सरकार हस्तक्षेप करुन पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) खाली आणेल असा विश्वास बळवला आहे. पण शनिवारी, 10 डिसेंबर रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात कुठलाच फरक पडलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत अजून घसरण होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. देशातंर्गत गेल्या सहा महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कुठलाच बदल झालेला नाही हे विशेष.
दरम्यान केंद्र सरकारवर किंमती कमी करण्यासाठी दबाव आला आहे. केंद्र सरकार आता प्रत्येक 15 दिवसानंतर इंधनावरील कराचा आढावा घेणार आहे. केंद्र सरकार कच्चे तेल, पेट्रोल-डिझेलच्या किंमती, विमान इंधन (ATF) यांच्यावरील कराचा आढावा घेणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव 80 डॉलरच्या खाली आले आहेत. ब्रेंट क्रूडचा भाव 76.10 डॉलर आणि डब्लूटीआई क्रूडचा दर 71.02 डॉलर वर आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कच्चा तेलाचे भाव सातत्याने घसरणीवर आहेत. पण त्याचा कुठलाही परिणाम भारतीय बाजारात दिसून येत नाही.
22 मे नंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कुठलाच बदल झालेला नाही. प्रत्येक दिवशी सकाळी 6 वाजता तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलचे भाव जारी करतात. तुम्हाला तुमच्या शहरातील भाव जाणून घेता येतात. त्यासाठी एसएमएस पाठवावा लागतो.
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज SMS द्वारे तुम्ही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या (IOC) ग्राहकांना RSP<डीलर कोड> टाकून 9224992249 या क्रमांकावर तर एचपीसीएल (HPCL) ग्राहकांनी HPPRICE <डीलर कोड> लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवावा . बीपीसीएल (BPCL) ग्राहकांनी RSP<डीलर कोड> असे लिहून 9223112222 या मोबाईल क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर लागलीच तुम्हाला तुमच्या शहरातील आजचे इंधन दर मिळतील.