नवी दिल्ली : रविवारी बाहेर फिरायला निघण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलचे भाव जाणून घ्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती (Crude Oil Price) घसरलेल्या आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून कच्चा तेलाचे दर आटोक्यात आहेत. आज डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलच्या किंमती 76.34 डॉलर प्रति बॅरलवर आहेत. तर ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 83 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या आहेत. तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) अपडेट करतात. सकाळी सहा वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
महाराष्ट्रात पेट्रोलच्या किंमतीत 81 पैशांची वाढ होऊन ते 106.96 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. तर डिझेलमध्ये 79 पैशांची वाढ झाली असून त्याचा भाव 93.46 रुपये प्रति लिटरवर पोहचला आहे. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.
तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.
मोदी सरकारने (Modi Government) गेल्या सहा महिन्यात, 22 मे 2022 पासून देशात इंधन दरवाढ होऊ दिली नाही. पण जनतेला मोठा दिलासाही दिला नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमण (Nirmala Sitharaman) यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्वस्त झाल्यातर जनतेला हा मोठा दिलासा असेल. या निर्णयामुळे महागाई आटोक्यात आणण्याच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रयत्नांना बळकटी मिळेल.