Petrol-Diesel Price : आनंदवार्ता धडकली; स्वस्त होतील पेट्रोल-डिझेलच्या किंमती; इतक्या रुपयांची होणार कपात

| Updated on: Sep 28, 2024 | 3:08 PM

Petrol-Diesel Price Decrease : गेल्या काही महिन्यांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. तरीही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात झालेली नाही. जम्मू-काश्मीर हरियाणानंतर महाराष्ट्रासह इतर राज्यातील निवडणुका येऊ घातल्याने लवकरच इंधन स्वस्ताई येण्याची शक्यता आहे.

Petrol-Diesel Price : आनंदवार्ता धडकली; स्वस्त होतील पेट्रोल-डिझेलच्या किंमती; इतक्या रुपयांची होणार कपात
पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?
Follow us on

कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. मार्चपासून ते आतापर्यंत क्रूड ऑईलमध्ये 19 टक्क्यांची घसरण झाली आहे. पण अद्याप तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही कपात केलेली नाही. सर्वसामान्यांना गेल्या दोन वर्षांत इंधनाच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळालेला नाही. म्हणायला किंमती लॉक करुन ठेवलेल्या आहेत. मार्चपासून ते आतापर्यंत पेट्रोलवर तेल कंपन्यांना प्रति लिटर 15 रुपयांचा फायदा झाला आहे. तर डिझेलवर 12 रुपये प्रति लिटरचा नफा मिळत आहे.

आता हरियाणासह इतर अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार यावेळी इंधन किंमतीत कपात करुन मतदारांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सरकार सणासुदीच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 2 ते 3 रुपये कपात करण्याच्या विचारात आहे. अर्थात हा निर्णय कधी घेण्यात येणार याविषयी माहिती समोर आली नाही. पण येत्या महिनाभरात असा निर्णय घेऊन मोदी सरकार सुखद धक्का देण्याच्या तयारीत आहे.

कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण

हे सुद्धा वाचा

मार्च महिन्यात कच्चा तेलाच्या किंमती जवळपास 84 डॉलर प्रति बॅरल इतक्या होत्या. आता या किंमतीत प्रति बॅरल 16 डॉलर म्हणजे जवळपास 19 टक्क्यांची घसरण झाली आहे. या गेल्या आठवड्यात या किंमतीत जवळपास 4 डॉलरची कपात झाली आहे. या काळात तेल विपणन कंपन्यांच्या नफ्यात जोरदार वाढ झाली आहे.  कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होऊन सुद्धा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणतीही कपात झालेली नाही.

मग स्वस्ताई येणार तरी कधी?

येत्या दोन महिन्यात अथवा पुढील महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या स्वस्ताईविषयीचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रेटिंग एजन्सी इक्रानुसार जर कच्चा तेलाचे भाव येत्या दोन महिन्यात स्थिर राहिले तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 2 ते 3 रुपये प्रति लिटरची कपात होण्याची शक्यता आहे. सध्या देशात सर्वात महागडे पेट्रोल-डिझेल आंध्र प्रदेशात मिळते. या राज्यात पेट्रोल 108.46 रुपये प्रति लिटर तर डिझेल 96 रुपये प्रति लिटर आहे.