नवी दिल्ली : भारतात गेल्या सहा-सात महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या भावात (Petrol Diesel Price) कुठलाही बदल झालेला नाही. देशात दोन वर्षांपूर्वी पेट्रोल-डिझेलचे भाव झपाट्याने वाढले. हे भाव 120 रुपयांच्या आसपास गेल्यावर मोठी आरोड झाली. त्यानंतर केंद्र सरकारने त्यावरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. तर काही राज्यांनीही कर कपात केली. त्याचा थोडा दिलासा जनतेला मिळाला. मे 2022 नंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या भावात मोठी वाढ झालेली नाही. मात्र दिलासा ही मिळालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव (Crude Oil Price) घसरणीवर आहेत. धन दरवाढीवरुन जनतेत मोठा रोष आहे. केंद्र सरकारने याविषयी लवकरच तोडगा काढण्याची शक्यता आहे. इंधनावरील कराचा भार कमी करण्याची शक्यता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी वर्तवली आहे.
भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी सहा वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.
तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.