Marathi News Business Petrol Diesel Rate Today 28 June 2023 Crude oil is falling again, petrol diesel is cheap here, but expensive in this city, know today's price
Petrol Diesel Rate Today : कच्चा तेलात पडझड, कधी होणार पेट्रोल-डिझेल स्वस्त, आजचा भाव काय
Petrol Diesel Rate Today : कच्चा तेलात पडझड सुरुच आहे. केंद्र सरकार आणि तेल कंपन्या भाव कमी करण्याचा मुद्या एकमेकांकडे टोलावत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हीच युक्ती कामी येत आहे. विरोधकांना या मुद्यावर आक्रमक होता आलेले नाही. काय आहे आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव, एक क्लिकवर जाणून घ्या..
Ad
आजचा भाव काय
Follow us on
नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलात पडझड सुरुच आहे. रशियातील नव्या बंडाळीमुळे युक्रेनसोबतच्या युद्धाबाबत लवकरच निर्णायकी लढाई होऊ शकते. बंडाची धग कायम असल्याने बाजारावर दबाव आला आहे. तेल कंपन्या यातूनही फायद्याचे गणित जुळवून आणत आहे. त्यांना रशियाकडून स्वस्तात इंधन (Crude Oil Price) मिळत आहे. त्यावर प्रक्रिया करुन युरोपियन देशातील विक्रीतून कंपन्या मालामाल झाल्या आहेत. देशातंर्गत पेट्रोल-डिझेलच्या स्वस्ताईचा मुद्या समोर आला तर, कंपन्या आणि केंद्र सरकार एकमेकांकडे बोट दाखवत आहे. विरोधकांना या मुद्यावर आक्रमक होता आलेले नाही. काय आहे आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Price), एक क्लिकवर जाणून घ्या..
कच्चे तेल झाले स्वस्त
पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळीच 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव जाहीर केले आहेत. मार्च 2022 मध्ये क्रूड ऑईल गगनाला भिडले होते. किंमती प्रति बॅरल 140 डॉलर झाल्या होत्या. गेल्या सहा महिन्यांपासून कच्चे तेल दणकावून आपटले आहे. किंमती तेव्हापासून 80 डॉलर प्रति बॅरलच्या आत आहेत.
आजचा भाव काय
जागतिक बाजारात कच्चे तेल घसरणीवरच आहे. 28 जून रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 72.46 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलचा भाव 67.87 डॉलर प्रति बॅरल झाला होता. या किंमती घसरणीवर आहेत.