नवी दिल्ली : देशात बोलघेवड्या नेत्यांची काही कमी नाही. इंधनावर मलाईदार कमाई होत असल्याने केंद्र आणि राज्य दर कपातीचा निर्णय घेण्यास तयार नाहीत. धन वर्षाव होत असल्याने पेट्रोल-डिझेलची दर कपात करणे टाळण्यात येते. त्यासाठी काही तरी जुजबी कारणं समोर केली जातात. तेल कंपन्या तोट्यात असल्याची आवई उठवण्यात येते. कधी पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचे पिल्लू सोडल्या जाते. कोपराला गुळ लावण्याचा असा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून देशात सुरु आहे. त्यात बोलघेवडे नेते दिमतीला असतात. पण गेल्या वर्षभरात तरी जनतेला कोणताच दिलासा मिळालेला नाही. आता ब्रेंट क्रूड ऑईलने (Crude Oil) जागतिक बाजारात उसळी घेतली आहे. बाजारात कच्चे तेल 80 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहे. या 1 मे नंतर पहिल्यांदा ब्रेंट क्रूड ऑईलने षटकार हाणला आहे. आता खरंच पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today) उतरणार का?
सकाळी किंमती अपडेट
भारतीय तेल कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाहीर केल्या. सकाळी 6 वाजता इंधनाचे भाव अपडेट करण्यात आले. जून 2017 पूर्वी 15 दिवसांनी इंधनाच्या किंमती अपडेट करण्यात येत होत्या. आता
कंपन्या दररोज इंधनाचे दर जाहीर करतात.
कच्चे तेल गगनाला भिडले
जागतिक बाजारात कच्चा तेलाने मोठी उसळी घेतली. 13 जुलै रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 80.21 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईल 76 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास पोहचले आहेत. या 1 मे नंतर पहिल्यांदा ब्रेंट क्रूड ऑईलने षटकार हाणला आहे.
गेल्यावर्षी उडाला होता भडका
गेल्यावर्षी रशिया-युक्रेन युद्ध भडकले. कच्चे तेलाचे भाव मार्च 2022 मध्ये गगनाला भिडले.. किंमती प्रति बॅरल 140 डॉलरवर गेल्या. नवीन वर्षात, 2023 मध्ये कच्चा तेलाने मोठी उसळी घेतली नाही. भाव एकदाच 90 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचले. पण आता पुन्हा किंमतींनी उसळी घेतली आहे.
कंपन्या मालामाल
भारतीय तेल कंपन्या गेल्या वर्षभरापासून फायद्यात आहेत. मे 2023 पर्यंत या कंपन्यांनी कमीत कमी 7.17 अब्ज डॉलरची बचत केली आहे. ही बचत म्हणजे कमाईच केली आहे. इंडियन एक्सप्रेसने भारतीय कॉमर्स मंत्रालयाच्या रिपोर्टआधारे ही आकडेवारी दिली आहे. रिपोर्टमध्ये गेल्या 14 महिन्यांतील डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)