केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल, डिझेलवरील अबकारी करामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहेत. तर काही राज्यांकडून देखील व्हॅटमध्ये कपात करण्यात आली आहे.
Ad
अशोक गहलोत
Follow us on
जयपूर : राज्यात महागाईचा भडका उडाला असताना जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) शनिवारी पेट्रोल, डिझेलवरील अबकारी करामध्ये (Excise tax) कपात करण्याचा निर्णय घेतला. अबकारी करामध्ये कपात करण्यात आल्याने पेट्रोल 9.5 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. नवे दर (Petrol Diesel Price) आजपासून लागू झाले आहेत. अबकारी करात कपात करण्यात आल्याने अनेक राज्यांमध्ये डिझेलचे दर हे 100 रुपये प्रति लिटरपेक्षा कमी झाले आहेत. दुसरीकडे राजस्थानमधील जनतेला डबल बोनस मिळाले आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील अबकारी करात कपात करताच राजस्थान सरकारकडून देखील व्हॅटमध्ये कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने व्हॅटमध्ये कपात केल्याने राजस्थानमध्ये पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त झाले आहे. व्हॅट कमी करण्यात आल्यामुळे राजस्थानमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत पेट्रोल, डिझेलचे भाव आणखी स्वस्त झाले आहेत. राज्यात पेट्रोल प्रति लिटर मागे 10.48 रुपयांनी तर डिझेल 7.16 रुपयांनी स्वस्त झाले आहेत.
केन्द्र सरकार द्वारा पेट्रोल-डीजल की कीमतों में की गई एक्साइज कटौती से राज्य सरकार का पेट्रोल पर 2.48 रुपये प्रति लीटर एवं डीजल पर 1.16 रुपये प्रति लीटर वैट भी कम होगा। इससे प्रदेश में पेट्रोल 10.48 रुपये एवं डीजल 7.16 रुपये प्रति लीटर सस्ता होगा।
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या अबकारी करामध्ये कपात करण्यात आल्याची घोषणा करताच राजस्थान सरकारने देखील व्हॅट कपातीचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. राजस्तान सरकारने व्हॅटमध्ये कपात केल्याने राज्यात पेट्रोल अतिरिक्त 2.48 तर डिझेल 1.16 रुपयांनी स्वस्त झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या वतीने देण्यात आली आहे. राजस्थानप्रमाणेच केरळ आणि ओडिशा सरकारने देखील व्हॅटमध्ये कपातीचा निर्णय घेतला आहे. केरळ सरकारने पेट्रोलवरील व्हॅटमध्ये 2.41 रुपये तर डिझेलवरील व्हॅटमध्ये 1.36 रुपयांची कपात केली आहे. तर ओडिशा सरकारने पेट्रोलवरील व्हॅटमध्ये 2.23 आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये 1.36 रुपयांची कपात केली आहे.
केंद्राकडून राज्यांना व्हॅटमध्ये कपात करण्याचे आवाहन
वाढत्या इंधनदरापासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने चार नोव्हेंबर 2021 ला पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली होती. तेव्हा पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. केंद्राने कर कपात केल्यानंतर राज्यांनी देखील व्हॅटमध्ये कपात करावी असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले होते. तेव्हा काही राज्यांकडून व्हॅटमध्ये कपात करण्यात आली होती. शनिवारी पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या वतीने करात कपात करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आता तरी व्हॅटमध्ये कपात होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.