मुंबई : पेट्रोल आणि डिझेल हे सध्या माणसाच्या जीवनाचा भाग बनले आहेत (Petrol Price Today). त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या बदलत्या दरांचा सामान्य माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे तेल कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे बदललेले दर जारी करतात (Petrol Price Today).
कोरोनाच्या कठीण काळात राज्याची अर्थव्यवस्था स्थिरावत असताना पुन्हा एकदा नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे. कारण, अनेक जिल्ह्यांमध्ये इंधनांच्या दरांमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यातही देशातलं सगळ्यात महाग पेट्रोल हे महाराष्ट्रात आहे. राज्यात नांदेड, परभणी जिल्ह्यात सर्वाधिक महाग पेट्रोल आहे. आज परभणीमध्ये प्रति लीटर पेट्रोलसाठी 95.26 रुपये मोजावे लागणार आहेत तर नांदेडमध्ये प्रति लीटर पेट्रोलचा भाव 96.19 रुपयांवर पोहोचला आहे.
अकोला 92.76 92.86
अमरावती 93.65 94.42
औरंगाबाद 94.02 93.08
भंडारा 93.67 93.46
बीड 94.34 92.98
बुलढाणा 92.98 93.22
चंद्रपूर 93.86 93.74
धुळे 92.79 93.51
गडचिरोली 93.82 93.52
गोंदिया 93.82 93.98
ग्रेटर मुंबई 92.92 92.92
हिंगोली 93.58 93.86
जळगाव 94.42 93.08
जालना 94.33 93.23
कोल्हापूर 93.09 92.07
लातूर 93.96 93.68
मुंबई 92.86 92.86
नागपूर 93.37 92.76
नांदेड 96.18 95.03
नंदूरबार 93.98 93.45
नाशिक 93.17 93.18
परभणी 95.19 95.21
पुणे 92.48 92.53
राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांकी गाठली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 90 च्या पार गेली आहे. तर डिझेलचे दर हे 80 रुपयांच्या पार गेले आहेत. मात्र, प्रक्रिया केल्यानंतर पेट्रोल पंपावर पेट्रोलचा मूळ दर हा 28.50 रुपये प्रति लीटर असते. तर डिझेलचा मूळ दर हा 29.52 रुपये प्रति लीटर असते. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या करांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. सरकार पेट्रोल आणि डिझेलवर त्याच्या मुळ किमतीच्या दुप्पटीपेक्षा जास्त कर आकारते.
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात (Petrol Price Today).
मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल.
Petrol Price Hike : आजही पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ; नांदेड, परभणीत सगळ्यात महाग पेट्रोलhttps://t.co/l544scbjkz#PetrolPriceHike #PetrolPrice #PetrolPrices
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 28, 2021
Petrol Price Today
संबंधित बातम्या :
अरे देवा! बिटकॉइनच्या रुपात या व्यक्तीकडे आहेत 1800 कोटी, पण विसरला पासवर्ड
petrol diesel price : पुन्हा वाढले पेट्रोलचे दर, डिझेलही महागलं; वाचा तुमच्या शहरातले ताजे भाव
Gold Silver Rate Today: सोने-चांदी पुन्हा एकदा स्वस्त; आजचे भाव काय?