Textile Letter Viral | AK Spintex या राजस्थानच्या कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला लिहिलेल्या पत्रात, “आम्हाला हे कळविण्यात आनंद होत आहे की आमच्या कंपनीच्या प्रवर्तक श्रीमती सरोज देवी छाबरा, ज्यांचे कंपनीत 4,41,000 समभाग (8.76%) शेअर्स आहेत, आता त्या या जगात नाहीत.’असे लिहिले आहे. या कंपनीने कॉपी पेस्टचा अत्यंत वाहयात नमुना पेश केला आहे. या कंपनीच्या प्रवर्तकाचे (Promoters) निधन झालेले असताना, जून्याच लेटरवर फक्त एक ओळ जास्तीची जोडून वेळ मारुन नेणे अंगलट आले आहे. कॉर्पोरेट फाईलिंग (Corporate Filling) दरम्यान ही गंभीर चूक लक्षात आली आहे. कंपनीचे हे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने कंपनीची नाचक्की झाली आहे. या पत्रावर लोकांच्या तिखीट आणि मिश्किल प्रतिक्रिया येत आहेत. कॉपी पेस्टर धन्य असल्याची प्रतिक्रिया ही उमटली आहे.
एवढी वाईट बातमी पण कंपनीच्या सेक्रेटरीमुळे या बातमीतील गांभीर्य हरवले आहे. मागील पत्राचं कॉपी पेस्ट करुन त्यात त्यांच्या निधनाची ओळ जास्तीची घालण्यात आली. पण असे करताना पत्राचा सुरुवातीचा मजकूरही तपासण्याची तसदी सेक्रेटरीने घेतली नाही. त्यामुळे कंपनीचा बाजारात आणि समाज माध्यमात पाणउतारा होत आहे. व्हायरल मॅसेजवरच चुका अधोरेखीत करण्यात आल्या आहेत.
Dear investors, the world in a cruel place once you are gone.look at AK Spintex folks ?
Vakil Saheb @RURALINDIA , see how company secretaries using old template/wrong template changes the meaning.
Can something be done to correct the issue. #stockmarketnews pic.twitter.com/2QPWkmdmKe
— D – Dukhi Aatma ? (@_setoodeh) August 26, 2022
AK Spintex ही कंपनी कपड्याचे उत्पादन करते. कंपनीने त्यांच्या प्रवर्तक सरोज देवी छाबरा यांच्या निधनाची माहिती मुंबई शेअर बाजाराला कळवली. त्यासंबंधीचे पत्र 25 ऑगस्ट रोजी मुंबई शेअर बाजाराला पाठवण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला लिहिलेल्या पत्रात, ‘आम्हाला हे कळविण्यात आनंद होत आहे की आमच्या कंपनीच्या प्रवर्तक श्रीमती सरोज देवी छाबरा, ज्यांचे कंपनीत 4,41,000 शेअर्स (8.76%) शेअर्स आहेत. त्या या जगात नाहीत’, असा मजकूर लिहिला आहे. ही माहिती रेकॉर्डवर ठेवण्याची विनंती शेअर बाजाराला कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे.
या पत्रावर कंपनीचे कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी आशिष बागरेचा यांची स्वाक्षरी आहे. हे पत्र सोशल मीडियावर शेअर होताच अनेकांनी सचिवांच्या या चुकीबद्दल चांगलेच फटकारले. सचिव समाज माध्यमावर ट्रोल झाले. कॉपी पेस्ट करताना बुद्धीचा तर वापर करावा असा टोला ही काहींनी लगावला. या कंपनीच्या गुंतवणूकदारांना उद्देशून त्यांनी कंपनीच्या या भोंगळ कारभाराचे वाभाडे काढले आहेत. तर काहींनी छोट्या कामचुकारपणामुळे अर्थाचा कसा अनर्थ झाला यावर बोट ठेवले आहे.