नवी दिल्ली : जन धन योजनेतील (PM Jan Dhan Yojana-PMJDY) खातेदारांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकार (Central Government) या खातेदारांना (Account Holder) कमाईची संधी देणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने मोठी योजना आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जन धन योजना ही महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेतंर्गत सर्व भारतीयांना बँकांसाठी जोडण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार, जन धन खातेदारांना घरबसल्या कमाईचं साधन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अर्थात सरकार कसलेही अनुदान देणार नाही. पण खातेदारांना मोठ्या गुंतवणूक योजनांमध्ये सहभागी होता येणार आहे. त्यामाध्यमातून कमाई करता येणार आहे.
सध्या या योजनेत 1.76 कोटी रुपये जनधन खात्यांमध्ये आहेत. मोठ्या प्रमाणात खातेदार आहेत. त्यांना विविध गुंतवणूक योजनांमध्ये सहभागी करुन घेण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने पाऊले उचलली आहेत.
सर्वसामान्य आणि गरीब लोकांनाही बचतीच्या माध्यमातून गुंतवणूक करता यावी आणि त्यामाध्यमातून कमाई करता यावी, असा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी सेबी (SEBI) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांच्यासोबत चर्चा सुरु आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान जन धन योजनेतंर्गत खातेधारकांना आता गोल्ड बाँड, ईटीएफ, म्युच्युअल फंड आणि मुदत ठेव यासारख्या योजनांमध्ये थेट गुंतवणूक करता यावी यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
देशातील गरिबांना बँकिंग सुविधा मिळाव्यात आणि मोठ्या प्रमाणावरील हा वर्ग बँकिंग सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी जनधन योजनेची सुरुवात करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात देशभरात 47 कोटींहून अधिक खाते उघडण्यात आले होते.
या खात्यांमध्ये सध्या एकूण 1.76 कोटी रुपये जमा आहेत. केंद्र सरकार हा निधी गुंतवणुकीसाठी वापरु इच्छिते. खातेदारांना विविध योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करुन त्यांना चांगली कमाई करता येऊ शकते.
ही सेवा खातेदारांपर्यंत पोहचविण्यासाठी 1.26 बँक मित्रांची मदत घेण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आता सेबी आणि आरबीआयच्या मदतीने ही योजना राबविण्यात येणार आहे.