PM Surya Ghar Yojana | योजनाच लय भारी, घरीच तयार करा वीज, या गोष्टी करु नका दुर्लक्षित

| Updated on: Feb 28, 2024 | 4:04 PM

PM Surya Ghar Yojana | पीएम सूर्य घर योजनेत लाभार्थ्यांना 300 युनिट मोफत वीज मिळेल. तसेच सबसिडीचा पण लाभ मिळेल. पण त्यासाठी काही दिशा निर्देश आहेत. अनेका या योजनेत कुठे आणि कसा अर्ज करावा हे माहिती नाही. खर्चाचे गणित काय हे माहिती नाही, त्याविषयी या 5 मुद्यांआधारे जाणून घेऊयात..

PM Surya Ghar Yojana | योजनाच लय भारी, घरीच तयार करा वीज, या गोष्टी करु नका दुर्लक्षित
Follow us on

नवी दिल्ली | 28 February 2024 : देशातील सर्वच राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुफटॉप योजना (Rooftop Scheme) सुरु झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतीच पीएम सूर्य घर योजना सुरु केली आहे. यापूर्वी पीएम सर्वोदय योजना (PMSY) 300 युनिट कमी खर्चात सुरु करण्यात आली होती. केंद्र सरकारने या योजनेतंर्गत एकूण खर्चाच्या 60 टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली आहे. पीएम सूर्य घर योजनेत 1 कोटी घरांना मोफत सोलर बसविण्याची सुरुवात झाली आहे. ही योजना सर्वांसाठी नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाच मुद्यांवर लक्ष देणे आवश्यक आहे.

  1. पीएम सूर्य घर योजनेतील लाभार्थ्यांनाच 300 युनिट मोफत वीज मिळेल. इतर योजनांप्रमाणेच या योजनेत सबसिडी मिळेल. पीएसयू या योजनेवर देखरेख ठेवले. वीजचे उत्पादन आणि खर्चाच बजेट सांगेल.
  2. https://pmsuryaghar.org.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही योजनेसाठी अर्ज करु शकता. योजनेतंर्गत लाभार्थ्यांना 300 युनिट मोफत वीज मिळेल. एनटीपीसी, एनएचपीसी, पीएफसी, पावर ग्रिड, नीपको, एसजीवीएन, टीएचडीसी आणि ग्रिड इंडिया या पीएसयू या योजनेवर देखरेख ठेवतील.
  3. जर तुम्ही छतावर 2kw सोलर रुफटॉप बसवू इच्छित असाल तर त्यासाठी 47000 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकार या खर्चावर तुम्हाला 18000रुपयांची सबसिडी देईल. देशातील अनेक राज्यांनी पण केंद्रा इतकीच सबसिडी देण्याची घोषण केली आहे. त्यामुळे 36000 रुपयांची सबसिडी मिळेल. उर्वरीत रक्कम खिशात नसेल तर बँकेकडून कर्ज उपलब्ध होईल.
  4. ऊर्जा मंत्रालयानुसर, 130 चौरसफुट जागेवर सोलर रुफटॉप प्लँट दररोज 4.32 किलोवॅट वीज तयार करेल. त्याचा वार्षिक हिशेब लावल्यास जवळपास 1576.8 किलोवॅट प्रत्येक वर्षी वीज उत्पादन होईल. त्यामुळे प्रति दिवशी जवळपास 13 रुपयांची बचत होईल आणि वार्षिक 5000 रुपयांची बचत होईल.
  5. हे सुद्धा वाचा
  6. जर तुम्ही 4kw चे रुफटॉप बसवू इच्छित असाल तर तुम्हाला 200 चौरसफूट जमीन लागेल. रुफटॉप सोलर प्लँट लावल्यावर 86000 रुपये खर्च येईल. यामध्ये केंद्र सरकार 36000 रुपये सबसिडी देईल. तुम्हाला 50000 रुपये खिशातून द्यावे लागतील. तुम्ही राज्य सरकारच्या सबसिडीचा फायदा घेऊ शकता. त्यामुळे प्रत्येक दिवशी 8.64 किलोवॅट वीज उत्पादन होईल. वार्षिक 9460 रुपयांची बचत होईल. PM Surya Ghar Yojana चा लाभ केवळ गरीब आणि मध्यमवर्गातील कुटुंबांनाच होईल.